Ranjitsinh Mohite Patill: रणजीतसिंह मोहिते पाटील खरंच काँग्रेसच्या वाटेवर?, काय आहे प्रकरण?
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळणार आहेत. यात एक भूकंप पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. मोहिते यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट घेतल्याचीही माहिती आहे. माढा विधानसभा लढवण्याबाबत काँग्रेसच्या हायकमांडशी चर्चा होऊन त्यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. उद्या राज्यातील काँग्रसचे नेते अकलूजमध्ये याबद्दल चर्चा करणार असल्याचीही सुत्रांची माहिती आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवासेनेचं एकहाती वर्चस्व; विजयी उमेदवार आज उद्धव ठाकरेंची घेणार भेट
निकटवर्तीयांकडून चर्चांचे खंडण :
मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने अकलुज येथे महाविकास आघाडीतील 30 खासदारांचा सत्कार सोहळा रविवार (दि. २९ सप्टेंबर) रोजी आयोजित केला आहे. या सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला जाणार आहे. तसंच, शरद पवार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हावासिय म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, त्याच्यामध्ये तथ्य नसल्याचे मोहिते पाटील यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच, सध्या मोहिते पाटलांचा तसा कोणताही विचार नाही माध्यमांमध्येही अशा पद्धतीचा खुलासा केल्याचं निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. सुशिलकुमार शिंदे यांच्या सत्कार सोहळ्याने या चर्चा सुरू झाल्या असंही त्यांनी म्हटलं आहे.
दबदबा अजूनही कायम
मोहिते पाटील आणि सोलापूर असे एक समिकरण आहे. मोहित पाटील यांनी या जिल्ह्यात आपला दबदबा अजूनही कायम ठेवला आहे. शिवाय त्यांनी लोकसभेत आपली ताकद ही दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांना मोहिते पाटील कुटुंबाची मर्जी सांभाळावी लागणार आहे. मोहिते पाटील कुटुंब पाठीशी असतील तर विजय निश्चित असं इथलं गणित आहे. त्यामुळे येत्या विधानसभेच्या रणधुमाळीत मोहित पाटील कुटुंब ज्या बाजुने असेल त्या बाजुने राजकीय नेते पक्ष विचार करतात असं चित्र आहे. यातच रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगल्याने सोलापूर जिल्ह्यात राजकारणात नवा ट्वीस्ट पाहायला मिळतो की काय अशी स्थिती आहे.