Download App

Video : सत्यजीत तांबे यांना मी डेमो देऊ शकतो…, ‘त्या’ आरोपांवर सपकाळ यांनी काढला हिशोब

Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या

  • Written By: Last Updated:

Harshvardhan Sapkal On Satyajit Tambe : महाराष्ट्र विधान परिषदेचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसवर (Maharashtra Congress) जोरदार हल्लाबोल करत आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) लवकर कोणाला भेटत नाही तसेच आमचे फोन उचलत नाही असा आरोप देखील आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. तर लेट्सअप मराठीशी (Letsupp Marathi) बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी आमचे नेते आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांनी हजारो कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे. तर राहुल गांधी कोणत्याही वेळी सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असतात. मात्र काही लोक रिपीट रिपीट कॅसेट वाजवत आहे. जर तुम्हाला राहुल गांधी यांना काही सांगायचे असेल तर त्यासाठी पक्षात एक सिस्टिम आहे. या सिस्टिम जवळ तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकतात. मात्र दरवेळी मीच चांगला आणि माझ्या हिशोबाने निर्णय घ्या असं होत नाही. असं लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तर याबाबतचा डेमो मी सत्यजीत तांबेंना दाखवू शकतो असं देखील सपकाळ म्हणाले.

पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राहुल गांधी यांनी सत्यजीत तांबे यांच्या कुटुंबियांशी अनेकदा मनमोकळेपणाने गप्पा मारले आहे. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्यासाठी सत्यजीत तांबे यांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले आहे. असं देखील या मुलाखतीमध्ये सपकाळ म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी सत्यजीत तांबे यांच्याशी फोनवर देखील पक्ष संघटनेतील जबाबदारीबाबत चर्चा देखील केली असल्याचा खुलासा सपकाळ यांनी केला.

मराठी भाषा नाही आमची संस्कृती

महाराष्ट्रातील वारंवार राहुल गांधी यांना भेटणाऱ्या नेत्यांमध्ये सत्यजीत तांबे यांचा देखील समावेश आहे मात्र आता ते खोटे आरोप करत असल्याचा दावा लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. तर दुसरीकडे मराठी भाषा नाही आमची संस्कृती आहे. महाराष्ट्र धर्म आहे आणि तो टिकवण्यासाठी माझा पक्ष माझ्यासोबत आहे. आम्ही राज्यात तिसरी भाषा सक्तीचा विरोध केला आहे. अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली.

follow us