आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांना जेलमध्ये पाठवणार; राहुल गांधींचा हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांना जेलमध्ये पाठवणार; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi On Himanta Biswa Sarma : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी आसामचा दौरा केला. त्यांनी पक्ष नेत्यांसोबत बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये संघटना मजबूत करणे आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यात आली. राहुल गांधींनी चायगाव येथील सभेत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यावर जोरदार टीका केली. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, त्यांना तुरुंगात पाठवू, असं राहुल गांधी म्हणाले.

The Bengal Files चे यूएस प्रीमियर ‘या’ शहरांमध्ये होणार, विवेक अग्निहोत्री – पल्लवी जोशी अमेरिका रवाना 

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, आसामचे मुख्यमंत्री स्वतःला ‘राजा’ समजतात. पण ते जास्त काळ सत्तेत राहणार नाहीत. ते तुरुंगात जातील, काँग्रेसला हवे म्हणून नाही, तर आसामचे लोक त्यांना भ्रष्टाचारासाठी तिथे पाठवतील, असं राहुल गांधी म्हणाले. पुढं राहुल गांधी म्हणाले की, आसामचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत आता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह देखील त्यांना वाचवू शकणार नाहीत, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ‘ती’ ऑफर; उद्धव ठाकरे यांनी दिली एका वाक्यात उत्तर 

२०२६ च्या विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वासही राहुल गांधींनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आसामच्या लोकांना सत्य माहित आहे. लवकरच निवडणुका होतील आणि त्या निवडणुका काँग्रेस जिंकेल, असं ते म्हणाले.

यावेळी राहुल गांधींनी भाजपवर मतदार यादीत हेराफेरी केल्याचा आरोप केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत ते म्हणाले की, मतदार यादी दुरुस्तीच्या नावाखाली भाजप मतदार यादीत फेरफार करते. भाजपने महाराष्ट्रात फसवेगिरी करून विजय मिळवला. ते बिहारमध्येही तेच प्रयत्न करत आहेत. भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रात त्यांनी निवडणुक चोरली होती, अशी टीका राहुल गांधींनी केली

 

 

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube