Hasan Mushrif vs. Samarjeet Ghatge : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे. ‘हा राजा का भिकारी’ अशी टीका करत मुश्रीफांनी (Hasan Mushrif ) घाटगेंनी अधिकाऱ्यांच्या बदलींच्या कामात ‘दलाली’ केल्याचा आरोप केला आहे. ते गडहिंग्लज येथे आयोजित सभेत बोलत होते.च
घाटगे प्रत्येक आठवड्यात ३० ते ३५ कामांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जात होते.
त्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची प्रक्रिया होती. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी पत्रे घेऊन फडणवीसांकडे जाणं हे मला निष्ठा शिकवणार आहे का? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.
भारत पुढे जाऊ नये, अशी काही लोकांची इच्छा; सरसंघचालक मोहन भागवतांचा रोख कुणाकडं?
आमदार होण्यासाठी हिम्मत हवी असते, असंही हसन सुश्रीफ म्हणाले आहेत. ‘दुसऱ्यांना त्रास देऊन आमदार होता येत नाही, त्यासाठी तुम्हाला हिम्मत लागते,’ विरोधक राजे ईडीच्या मदतीने त्यांना त्रास देत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना भूमिका बदलावी लागली आहे.
दलितांची जमीन हडपणारे आणि कामगारांच्या चुलीत पाणी ओतणारे विरोधक आहेत. जनतेने दोन्ही प्रवृत्त्या तपासून डोळे उघडून मतदान करावं. विरोधकांचे विचार व प्रवृत्ती लोकांसमोर ठेवणं आवश्यक आहे, असं देखील मुश्रीफांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कागल विधानसभेची लढाई संघर्षाची होणार असल्याची शक्यता आहे.