डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर

World Pharmacists Day : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालय व आदित्य बिर्ला

World Pharmacists Day

World Pharmacists Day

World Pharmacists Day : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त महाविद्यालय व आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. के. निर्मला कुमारस्वामी, संचालिका, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अँड मॅनेजमेंट, पुणे यांनी केले. यावेळी त्यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व, नियमित आरोग्य तपासणी व रुग्ण समुपदेशनाचे महत्त्व तसेच समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यात फार्मासिस्टची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबीन, हाडांची घनता, बीएमआय, फुफ्फुसांचे आरोग्य व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण (SpO₂) आदी तपासण्या करण्यात आल्या. तपासणीच्या निष्कर्षांनुसार विद्यार्थ्यांनी सहभागींचे आरोग्यविषयक समुपदेशन केले. या प्रसंगी संकुल संचालक रिअर अॅडमिरल अमित विक्रम (नि.), डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्स यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना आरोग्य जनजागृती उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनशैली व नियमित आरोग्य तपासणीबाबत समाजात जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

या आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन महाविद्यालयातील फार्म. डी.च्या विद्यार्थ्यांनी केले होते. आकुर्डी शैक्षणिक संकुलातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. नियमित आरोग्य तपासणी, योग्य औषधोपचार व रुग्ण समुपदेशनाच्या माध्यमातून आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यात फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी सांगितले.

कारागृहातून खंडणी मागितल्या प्रकरणात निलेश घायवळ निर्दोष; मोक्का कोर्टाचा निर्णय-

या शिबिराचे यशस्वी आयोजन समन्वयक डॉ. ऐश्वर्या उंचेगावकर आणि डॉ. वेंकटेश चिंतलवार यांनी डॉ. रामदास शिंदे, विभागप्रमुख, फार्मसी प्रॅक्टिस विभाग (फार्म. डी.) यांच्या मार्गदर्शनाखाली केले. तसेच या कार्यक्रमासाठी डॉ. अनिकेत गरुड, डॉ. निकिता पारगे, डॉ. ऋतुजा हिप्परकर आणि डॉ. संकेत कदम यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी कुमकुम भेनवाल, गौरव गायकवाड आणि सानिया हलई यांनी शिबिराच्या आयोजनात विशेष योगदान दिले.

Exit mobile version