Download App

लाडकी बहिण योजनेमुळे सर्व खात्यांना निधीसाठी कसरत करावी लागतेय; आरोग्यमंत्री आबिटकरांची कबूली

Health Minister Prakash Aabitkar यांनी लाडकी बहिण योजनेमुळे होत असलेल्या तोट्यांची कबूली दिली आहे. या अगोदर मंत्री शिरसाटांनी या योजनेसाठी निधी वळवल्याचा दावा केला होता.

Health Minister Prakash Aabitkar on Mukhyamantri Mazi Ladaki Bahin scheme : राज्य सरकारच्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या या योजनेत लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. त्यात नुकतच एप्रिल महिन्याचा लाभ देखील महिलांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लाडकी बहिण योजनेमुळे होत असलेल्या तोट्यांची कबूली दिली आहे. तर या अगोदर मंत्री संजय शिरसाट यांनी देखील या योजनेसाठी निधी वळवला गेल्याचा दावा केला होता.

काय म्हणाले प्रकाश आबिटकर?

माध्यमांशी संवाद साधताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लाडकी बहिण योजनेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, लाडकी बहिण योजनेसाठी जो निधी दिला गेला आहे. त्यामुळे सर्व खात्यांना निधीची चणचण भासत आहे. त्यामुळे सर्व खात्यांना कसरत करावी लागत आहे. तसेच अर्थसंकल्पामध्ये देखील प्रत्येक विभागांना ज्या प्रमाणामध्ये निधी वितरित केला जाण्याची गरज होतीय तसा निधी मिळालेला नाही. त्यामुळे आमची सर्वांची थोडी अडचण झाली आहे. असं म्हणत प्रकाश आबिटकर यांनी एक प्रकारे लाडकी बहिण योजनेमुळे होत असलेल्या तोट्यांची कबूलीच दिली आहे.

“आता निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही”, शिंदेंच्या सभेला दांडी अन् केसरकरांचे निवृत्तीचे संकेत

त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, पहिल्या टप्प्यात थोडी धावपळ झाली. मात्र आता ही गाडी रूळावर येत आहे. लाडकी बहिणसह इतर ही अनेक योजनासाठीच्या निधीची उपलब्धता पुढील टप्प्यात होईल. असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

मंत्री संजय शिरसाट यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा लाडकी बहिण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थ खात्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, लाडकी बहिण लयोजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निदी वळता केला गेला आहे. अर्थ खात्यातून हे पैसे सर्रास वळते केले जात आहेत. त्यामुळे याची आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

follow us