Download App

Maharashtra Politics : आरोग्यमंत्री Tanaji Sawant यांच्या जावयाला अटक

  • Written By: Last Updated:

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस (Mohol Police) ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे आहेत. सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्यासह ५ भावांचे त्यांचं कुटुंबीय आहे. यामध्ये थोरले बंधू कालिदास सावंत यांची मुलगी अनगर (ता. मोहोळ) येथील जयसिंह चक्रपाणी गुंड यांना दिली आहे.

Anil Bonde : तुम्ही मूर्ख आहात का; अनिल बोंडेंवर वक्ता भडकला | LetsUpp Marathi

जयसिंह चक्रपाणी गुंड हे ग्रामविकास अधिकारी आहेत. त्यांचा मुलगा प्रथमेश जयसिंह गुंड यांचा अनगर या गावात छोटासा व्यवसाय करतो. ६ महिन्याअगोदर आमची मका लवकर खरेदी का करत नाही, म्हणून जयसिंह चक्रपाणी गुंड, प्रथमेश जयसिंह गुंड, जयवंत महादेव थिटे, अक्षय राजेंद्र कारमकर या चौघांनी गावातील एका व्यक्तीस शिवीगाळ केली होती, याबाबत त्यांच्यावर गुन्हा मोहोळ पोलिसांत दाखल केला आहे.

Congress नेत्याचे शरद पवारांसमोरच वादग्रस्त वक्तव्य : मोदींना पराभूत करण्यासाठी सौदीवरून लोकांना आणा!

या गुन्ह्याला १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी झालेल्या बाचाबाची प्रकाराची पार्श्वभूमी आहे. दरम्यान, राजकीय वैमनस्यातून जयसिंह गुंड आणि प्रथमेश गुंड यांना मारहाण झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास मोहोळ पोलीस करत आहेत.

follow us