Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यवतमाळसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागात वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूरसह इतर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात आज पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. माहितीनुसार, यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हंगामी फळांना आणि पिकांना मोठा फटका बसला आहे.
IND vs ZIM : भारताला मोठा धक्का, झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार नाही ‘हा’ स्टार खेळाडू; जाणून घ्या कारण
