Heavy Rain Between 20 And 25 October 2025 : राज्यभर आणि देशातील अनेक भागांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होताना दिसतो आहे. भारतातील मॉन्सूनचे ढग जरी पुढे गेले असले तरी अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अनेक प्रदेशांमध्ये पावसाची कारणीभूत ठरत आहे. ऐन दिवाळीच्या अगोदरही अनेक ठिकाणी पावसाचा सुरुवात झाला असून नागरिकांना यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची पिके वाहून गेली
मागील काही दिवसांतील पावसामुळे राज्यात काही ठिकाणी (Maharashtra Weather) मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली असून, त्यांचा मेहनतपूर्वक घेतलेला पिकांचा लाभ नष्ट झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील सात दिवसांत केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. अनेक भागात मुसळधार (Heavy Rain) ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. तर पुणे, रत्नागिरी, सातारा, सांगली आणि लातूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अनेक ठिकाणी पाऊस
हवामान विभागानुसार, 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद होऊ शकते. याशिवाय, छत्तीसगडमध्ये 20 ते 24 ऑक्टोबर आणि नागालँड, मणिपूर, मिजोरम व त्रिपुरा येथे 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
वादळी वाऱ्यासह जोरदार…
पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातील पावसाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. तसेच, अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असून, 24 ऑक्टोबर रोजी बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून, दिवाळीच्या सुमारासही नागरिकांना छत्र्या घेऊन फिरावे लागेल, तसेच पावसामुळे वाहतुकीवर आणि सार्वजनिक जीवनावर काहीसा परिणाम होऊ शकतो.