Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

Maharashtra Weather Update : देशामध्ये एकीकडे भारतीय हवामान विभागाने ( IMD) एक दिलासादायक बातमी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी देशात मान्सून लवकरच एंट्री करणार आहे. मात्र दुसरीकडे राज्यात ( Maharashtra ) मात्र पुढील दोन दिवस उष्णतेची लाट ( Weather Update) असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणखी दोन दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Horoscope Today: कामात मोठे यश, या राशींसाठी धनलाभाची शक्यता ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

यामध्ये पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात 40 अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. यामुळे लोक आतुरतेने मान्सूनची (Monsoon ) वाट पाहत आहे.

कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्राची जनता तुमचा घमेंड उतरवणार; राऊतांचे टीकास्त्र

त्याचबरोबर एल निनो कमजोर होत असल्याने देशात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात देखील यावेळी मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
मागील वर्षी देशात 8 जून रोजी मान्सूनची एंट्री झाली होती. मात्र यावर्षी दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज