Maharashtra Politics : MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?

Maharashtra Politics : MVA ची अडचण वाढणार, भिवंडीमध्ये शरद पवारांना आव्हान देणार काँग्रेसचा इच्छुक उमेदवार?

Maharashtra Politics: राज्यात आता लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha2024) रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी (MVA) आणि महायुती (MahaYuti) राज्यातील 48 पैकी जास्तीत जास्त लोकसभा जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे मात्र त्यांच्या या प्रयत्नांना बंडखोर उमेदवार आव्हान देताना दिसत आहे.

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Chandra Pawar) पक्षाने भिवंडी लोकसभा मतदारसंघातून (Bhiwandi Lok Sabha Constituency) सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Balamama Mhatre) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र आता या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे (Dayanand Chorghe) अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी घोषित होताच एक पत्रकार परिषद घेत आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार करत असल्याचं म्हटलं आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद चोरघे म्हणाले, काँग्रेस पक्षाला संपूर्ण कोकण प्रांतात जागावाटपात एकही जागा मिळाली नाही. यामुळे आता काँग्रेसचे चिन्ह मतपेटीसह पारंपरिक असलेल्या कोकण प्रांत व भिवंडी लोकसभा मतदार संघातून हद्दपार होणार आहे. यामुळे वरिष्ठांनी मला भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढतीचे आदेश द्यावेत नाहीतर मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी दाखल करेल, असं ते म्हणाले.

भिवंडीत होणार तिरंगी लढत?

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र आता या मतदारसंघात काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे अपक्ष लढण्याची तयारी करत असल्याने भिवंडी मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चांदरम्यान भिवंडीच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवार गटात रस्सीखेच सुरू होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज