Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले

Lok Sabha Election 2024 : राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्याप देखील काही लोकसभेच्या जागेवरून मतभेद होताना दिसत आहे. यामुळे कोणता पक्ष कोणत्या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

यातच काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्याला शिंदे गटातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र आता या चर्चांना पूर्वविराम लागला आहे. गोविंदाने स्वतः तो लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याचं उत्तर दिलं आहे.

आज गोविंदा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाला. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गोविंदाने आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत भाष्य केले.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गोविंदाला वायव्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे गोविंदा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.

या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना उमेदवारांना चांगलं यश मिळेल. माझा रेकॉर्ड चांगलं असून मी जिथे जातो तिथला उमेदवार विजय होतो असं त्यांनी सांगितले.

तर मुंबईतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नाचा उत्तर देत गोविंदा म्हणाला, मी आतापर्यंत तिकीट मागितलेलं नाही किंवा याबाबत काही चर्चा देखील केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि शिवसेनेच्या प्रचाराची दखल घेतली जाईल असा विश्वासही गोविंदा यांनी व्यक्त केला.

“एवढा लाचार माणूस पहिला नाही” रवी राणांवर बच्चू कडूंची जळजळीत टीका

तब्बल 14 वर्षांनंतर गोविंदाने राजकारणात पुनरामगन केले आहे. त्यांनी 2004 मध्ये भाजपने आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube