राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये बजरंग सोनवणेच तर भिवंडीत म्हात्रेंना उमेदवारी

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; बीडमध्ये बजरंग सोनवणेच तर भिवंडीत म्हात्रेंना उमेदवारी

Loksabha Election Ncp Candiate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar Group) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली तर भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

‘काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे एकमेकांत भांडतात’; निलंबनाच्या कारवाईनंतर निरुपम भडकले

बीड लोकसभा मतदारसंघातून शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरु होती. उमेदवारीसाठी ज्योती मेटे इच्छूक होत्या. त्यासाठी मेटे यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. मात्र, ज्योती मेटे यांना उमेदवारी न देता बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या नेत्या प्रितम मुंडे या विद्यमान खासदार होत्या. यंदा मात्र, प्रितम यांचं तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात थेट लढत होणार आहे.

श्रीकांत शिंदे बच्चा तर नाच्यांवर बोलणार नाही, म्हणत राऊतांची शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका

दरम्यान, आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये वर्धा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीमध्ये भास्कर भगरेस बारामतीमध्ये सुप्रिया सुळे, शिरुरमध्ये अमोल कोल्हे तर अहमदनगर दक्षिणसाठी निलेश लंके यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली होती. आता दुसऱ्या यादीत दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज