‘काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे एकमेकांत भांडतात’; निलंबनाच्या कारवाईनंतर निरुपम भडकले

‘काँग्रेसची पाच सत्ताकेंद्रे एकमेकांत भांडतात’; निलंबनाच्या कारवाईनंतर निरुपम भडकले

Sanjay Nirupan On Congress : काँग्रेसची पाच सत्ताकेंद्र एकमेकांमध्ये भांडत असल्याचं म्हणत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) काँग्रेसवर भडकले आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीतील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाविषयी विधान केल्याप्रकरणी निरुपम यांच्यावर काँग्रेसच्या हाय कमांडकडून सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्यांनी सडेतोडपणे भाष्य केलं आहे.

श्रीकांत शिंदे बच्चा तर नाच्यांवर बोलणार नाही, म्हणत राऊतांची शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका

संजय निरुपम म्हणाले, सध्या काँग्रेसची 5 सत्ताकेंद्रे आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जून खर्गे, के.सी वेणुगोपाल अशी 5 सत्ताकेंद्रे आहेत. हे पाच जण आपापसांत भांडतात, असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसचे भवितव्य संपले आहे. मी निवडणूक लढवणार पण अपक्ष म्हणून लढणार नाही. सध्या भारतात सोन्याच्या किमती, लाकडाचे वय आणि मोदीजींची लोकप्रियता सातत्याने वाढत असल्याचंही ते म्हणाले.

आता कुठं जाणार गद्दारांनो? लोकसभा फक्त ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील; ठाकरे गटाची टीका

तसेच संजय निरुपम यांनी जय श्री रामच्या जयघोषाने प्रेसची सुरुवात केली. ते म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी लोकांना आमंत्रित केले जात असताना एकट्या काँग्रेसने या कार्यक्रमावर प्रश्न उपस्थित केले होते. राम मंदिर सोहळा हा भाजपचा कार्यक्रम असल्याचे सांगितले आणि काँग्रेसने रामाचे अस्तित्व नाकारले असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला आहे.

Ayushman Khurana : वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार, लवकरच येणार पहिलं गाणं

कॉंग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवते. गांधीजींच्या धर्मनिरपेक्षतेमध्ये कोणत्याही धर्माला विरोध नाही. पुढे नेहरूवादी धर्मनिरपेक्षतेत हे बदलले आणि धर्माच्या अस्तित्वाला विरोध होऊ लागला. दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून तुम्ही तुमच्या पक्षातील नेत्यांची हकालपट्टी करत असल्याचाही आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

आज देश धार्मिक आहे. मोठमोठे उद्योगपती, चित्रपट तारे, क्रिकेटपटू मंदिरात जातात. पूर्वी त्यांना जायला संकोच वाटत होता. काँग्रेसमध्ये कालबाह्य लोकांचा भरणा आहे. भंगार साहित्य आहेत. काँग्रेस हे उद्ध्वस्त गाव आहे. त्यांच्या नेत्याच्या आत अजूनही किती अहंकार आहे. मी आठवडाभराचा अवधी दिला तेव्हा महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संजय निरुपम यांच्यासारख्यांना आम्ही भिक्षाही देत ​​नाही, पण मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारही, असा निर्धार संजय निरुपम यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज