Sanjay Nirupam: काँग्रेसमधून संजय निरुपम यांची हकालपट्टी; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

  • Written By: Last Updated:
Sanjay Nirupam: काँग्रेसमधून संजय निरुपम यांची हकालपट्टी; ‘या’ पक्षात करणार प्रवेश

Sanjay Nirupam : काँग्रेसने (Congress) लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मोठा निर्णय घेत पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम हा मतदारसंघ (Mumbai North West Constituency) उद्धव ठाकरे गटाला (UBT) दिल्याने काँग्रेसवर नाराज होते.

या जागेचा पुन्हा एकदा विचार करावा यासाठी त्यांनी काँग्रेसला 7 दिवसांचा कालावधी दिला होता. जर या 7 दिवसात काँग्रेसने या जागेसाठी विचार केला नाहीतर मी पक्ष सोडणार अशी घोषणा देखील त्यांनी केली होती मात्र आता काँग्रेसनेच त्यांची हकालपट्टी केली आहे.

काँग्रेसने संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याने निरुपम आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी सध्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

काही दिवसांपासून संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघातून लोकसभेसाठी दावा करत आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये काँग्रेसने ही जागा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनासाठी सोडली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे गटाने अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे संजय निरुपम काँग्रेसवर नाराज होते.

तर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निरुपम यांनी पंतप्रधान मोदी (MP Modi) यांची लोकप्रियता वाढत असल्याचे वक्तव्य केले. याच बरोबर त्यांनी या मुलाखतीत काँग्रेसबद्दलही वक्तव्य केल्याने काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Unmesh Patil News : महायुतीला जळगावचा पेपर टफ! भाजपवर हल्लाबोल करत उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

संजय निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आज ते आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहे. यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते येणाऱ्या दिवसात कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात निरुपम आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, निरुपम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून अमोल किर्तीकर यांच्या विरोधात त्यांना उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज