काँग्रेसने माझ्यावर जास्त ऊर्जा खर्च करू नये, तसंही पक्ष आर्थिक संकटात; संजय निरुपमांचा घरचा आहेर

काँग्रेसने माझ्यावर जास्त ऊर्जा खर्च करू नये, तसंही पक्ष आर्थिक संकटात; संजय निरुपमांचा घरचा आहेर

Sanjay Nirupam on Congress : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेच्या उमेदवारीवरून संजय निरुपम (Sanjay Nirupam) नाराज आहेत. कारण, त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती. मात्र ही जागा ठाकरे गटाकडे गेली आणि ठाकरे गटाने अमोल कीर्तिकरांना (Amol Kirtikar) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे निरुपम हे ठाकरे गटावर सातत्याने टीका करत आहेत. ठाकरे गटाकडून काँग्रेसला (Congress) दाबून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेकदा त्यांनी कॉंग्रेसवरही टीका केली. त्यामुळं त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याचीही शक्यता आहे.

विखे, तुम्हाला अण्णाभाऊ साठे आठवतात का? लंकेंसाठी आव्हाड मैदानात… 

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या ठाकरे गटाच्या नेत्यांचा मी प्रचार करणार नाही, असं विधान निरुपम यांनी केल. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. नाना पटोले यांनीही निरुपम यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय निरुपम यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीत होते, मात्र आता आम्ही त्यांचे नाव काढून टाकले आहे. ज्या पद्धतीने त्यांची वक्तव्ये येत आहेत, त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली आहे.

आता कुठं जाणार गद्दारांनो? लोकसभा फक्त ट्रेलर, दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील; ठाकरे गटाची टीका 

दरम्यान, पटोले यांच्या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांना ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.निरुपम यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी लिहिलं की, काँग्रेसने माझ्यावर जास्त ऊर्जा आणि स्टेशनरी खर्च करू नये. याउलट, त्यांची अतिरिक्त ऊर्जा आणि स्टेशनरी पक्ष वाचवण्यासाठी वापरली पाहिजे. तसंही काँग्रेस पक्ष मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मी पक्षाला एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. तो कालावधी आज संपत आहे. उद्या मी स्वतः निर्णय घेईन, असं ट्वीट निरुपम यांनी केलं.

निरुपम भाजपमध्ये जाणार ?
गेल्या काही दिवसांपासून निरुपम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. याआधी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या तीन नेत्यांनी काँग्रेस सोडून अनुक्रमे शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये प्रवेश केला. आता निरुपम यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास हा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube