विखे, तुम्हाला अण्णाभाऊ साठे आठवतात का? लंकेंसाठी आव्हाड मैदानात…

विखे, तुम्हाला अण्णाभाऊ साठे आठवतात का? लंकेंसाठी आव्हाड मैदानात…

Jitendra Awhad On Sujay Vikhe : इंग्रजी बोलण्यावरुन अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना चॅलेंज दिलं आहे. या चॅलेंजनंतर निलेश लंकेंकडूनही विखेंवर सडकून टीका करण्यात आली. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुजय विखेंना खोचक सवाल केलायं. तुम्हाला अण्णाभाऊ साठे आठवतात का? असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. यासंदर्भातील ट्विट आव्हाडांनी शेअर केलं आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा एकदा सुजय विखे यांनाच उमेदवारी देण्यात आलीयं. तर महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली. लंके यांना उमेदवारी जाहीर होताच पाथर्डीतील मोहटादेवी गडावर स्वाभिमान जनसंवाद यात्रेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांकडून सुजय विखे यांच्यावर हल्लाबोल चढवण्यात आला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी निलेश लंके यांना इंग्रजी बोलण्याबाबतच चॅलेंजच दिलं होतं. निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर भोकमपट्टी करावी, पाठ करुन बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असे चॅलेंजच सुजय विखेंनी लंकेंना दिले होते.

विकासकामं करणं म्हणजे अ‍ॅक्टिंग करण्यासारखं नाही; आढळरावांनी कोल्हेंना डिवचले

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच विखे यांनी संसदेतील त्यांच्या इंग्रजी भाषणाचा एक व्हिडिओ दाखवला. याचाच आधार घेत सुजय विखे यांनी निलेश लंकेंना आव्हान दिले. महिनाभरात त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवावं असे आव्हान दिले.

सुजय विखे यांच्या चॅलेंजनंतर निलेश लंकेंनीही आक्रमक पवित्रा घेत टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. ते म्हणाले, काबाडकष्टाने ताकद आणि पैशावर मात करता येते, असे इंग्रजीत वाक्य लिहून लंकेंनी सुजय विखे पाटलांना लक्ष्य केलं. तसेच, वैयक्तिक टीका टिपण्णी करण्यापेक्षा गेल्या ५ वर्षात मतदारसंघातील जनतेसाठी आपण काय केलं, हे सांगावं, असा सवालही लंकेंनी विखे पाटलांना विचारला होता.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुजय विखेंकडून आम्ही खासदार शशी थरुर यांच्यासारख्या बोलण्याची अपेक्षा करतो. अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले होते, जे मागासवर्गीय समाजातून आणि महाराष्ट्राच्या एका लहानशा खेड्यातून मुंबईला आले होते. अण्णांनी अनेक पुस्तके आणि काव्यसंग्रह लिहिले, ज्यांचं जगभराने कौतुक केलं आहे, ते अण्णाभाऊ तुम्हाला आठवतात का? असा सवालही सुजय विखेंना जितेंद्र आव्हाडांनी केलायं.

.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube