विकासकामं करणं म्हणजे अॅक्टिंग करण्यासारखं नाही; आढळरावांनी कोल्हेंना डिवचले
Shivajirao Aadhalrao Criticize Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao ) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने ( Amol Kolhe ) आहेत. त्यात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका आणि पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यावरून अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.
“शरद पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला”; फडणवीसांचा खोचक टोला
यावेळी बोलताना आढळराव म्हणाले की, बैलगाडा बंदी उठविण्यासाठी मी प्रयत्न केले औरंगाबाद खंडपीठ, हायकोर्टात की स्वतः पैसे खर्च करून केस लढलो. माझ्या अंगावर आंदोलनाच्या 3-4 केसेस आहेत. आम्ही चुकलो हे मतदारसंघातील गावचे लोक सांगतात. मी महाराष्ट्राला एकमेव खासदार ज्याने बैलगाडा शर्यतीवरील 42 गावांमध्ये घाट बांधले. आत्ताची बंदी ना माझ्यामुळे ना कोल्हेमुळे तर राज्य सरकारने चांगले वकील देऊन लढले, त्यामुळे बंदी उठली. त्यांनी दोन वेळा लोकसभेत भाषणे केली तर मी 4 वेळा 3 खासगी विषयके मांडली.
Ayushman Khurana : वॉर्नर म्युझिक इंडियासोबत जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणार, लवकरच येणार पहिलं गाणं
पुणे नाशिक हायवेसाठी 2008 ते 2013 तत्कालीन काँग्रेस सरकारसोबत भांडलो. त्यानंतर मंजुरी मिळाली तर नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात टेंडर निघाले. त्यावेळी आज बोलणारे राजकारणी नव्हते. मी केलेला पाठपुरावा दाखवतो. त्यांनी त्यांचे योगदान दाखवावे. असं म्हणत आढळरावांनी अमोल कोल्हे यांनां टोला लगावला आहे.
Bhool Bhulaiya 3: कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ चे 3 मोठ्या अपडेट्स जाणून घ्या
2005 पासून पुणे नाशिक रेल्वेसाठी पाठपुरावा करत होतो. 2019 साली हेच म्हणायचे की, रेल्वे होणार नाही. त्यावेळी खेळण्यातले रेल्वे इंजिन दाखवले. त्यांनी गेल्या पाच वर्षात कोणतेही काम केलं नाही. तुमच्याकडे केवळ बोलण्याची कला आहे. त्यामुळे गोड गोड बोलतात. एखादे विकासकाम करणे म्हणजे अॅक्टर सारखे अभिनय करणे नाही.
कांदा निर्यात बंदी वर तसेच त्याला भाव मिळावा म्हणून मी लोकसभेत ३ भाषणे केली, लोकसभेत यांनी शेती विषयावर २ भाषणे केली. मग शेतकऱ्याचा एवढं कळवळा असेल ते यांनी ते आजच का आठवल. त्यांना आजवर वेळच नव्हता आता लोकांपुढे जाण्यासाठी कांद्याचे गणित केवळ दाखवण्यासाठी बोलत आहेत. तसेच वंचित आघडीने यापूर्वी देखील आमच्या मतदारसंघात उमेदवारी दिली होती. आताही अनेक उमेदवार असतील यात काही नवीन नाही.