श्रीकांत शिंदे बच्चा तर नाच्यांवर बोलणार नाही, म्हणत राऊतांची शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका

श्रीकांत शिंदे बच्चा तर नाच्यांवर बोलणार नाही, म्हणत राऊतांची शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका

Sanjay Raut Criticize Shrikant Shinde and Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी ‘श्रीकांत शिंदे अजून हा बच्चा तसेच तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही.’ असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांच्यावर सडकून टीका केली. ते आज ( 4 एप्रिल ) च्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Rahul Gandhi : राहुल गांधींकडे फक्त 55 हजारांची रोख; स्वतःच घरही नाही

राऊतांना श्रीकांत शिंदेंबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आधी तुमची उमेदवारी जाहीर करा, कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे. अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही आणि जिंकण्याची भाषा करता. बच्चन जी दिल्ली अभी दूर है, आता तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही.

Chitra Wagh यांची कॉंग्रेसवर सडकून टीका; हेमा मालिनी अन् कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून आक्रमक

आमची सामान्य कार्यकर्त्या वैशाली दरेकर तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये अहंकार, गद्दारी आणि पैशांची मस्ती चालणार नाही आम्ही तुमचा पराभव करू. महाराष्ट्रात अनेक मोठ मोठे लोक पडले आहेत. श्रीकांत शिंदे अजून हा बच्चा आहे हिंमत असेल तर स्वतःची उमेदवारी आधी जाहीर करा. महाराष्ट्रात सर्व उमेदवाऱ्या जाहीर झाल्या फक्त तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातील राहिली आहे.

तर फडणवीसांवर बोलताना राऊतांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले की, तमाशातील नाच्यांवर बोलण्यात काही अर्थ नाही. नरेंद्र मोदी यांची अवस्था ही 2024 च्या निवडणुकीनंतर काय आहे? याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवावे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज