Shrikant Shinde : ‘शिव्याशाप सोडून आता राऊतांनी थुंकण्याचा व्यवसाय सुरू केला’

Shrikant Shinde : ‘शिव्याशाप सोडून आता राऊतांनी थुंकण्याचा व्यवसाय सुरू केला’

Shrikant Shinde On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला असून शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी राऊतांचा समाचार घेतला. काही लोकांनी थुंकण्याचा व्यवसाय सुरू केल्याची टीका त्यांनी केली. (Srikant Shinde said sanjay raut started the business of spitting)

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी चांगलेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केले असून ते मुंबईतील विविध शाखांना भेटी देत ​​आहेत. यानिमित्ताने ते तळागाळातील शिवसैनिकांशी चर्चा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शाखांना भेटी देत तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी राऊतांचा समाचार घेतला. श्रीकांत शिंदे म्हणाले, आधी सगळ्या पातळ्या सोडून सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शिव्या देण्याचं काम राऊत करायचे. महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचे काम त्यांनी केलं. आता शिव्या शाप कमी पडल्या म्हणून, काही लोकांनी आता थुंकण्याचा नवा व्यवसाय सुरू केला. महाराष्ट्राने अशी संस्कृती कधी पाहिली नाही, असं राऊत म्हणाले.

Box Office Collection : ‘जरा हटके जरा बचके’चा दबदबा, चित्रपटानं पाचव्या दिवशी केली कोटींची कमाई

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली. एकीकडे पर्यावरणाबाबत बोलायचे आणि दुसरीकडे 25 वर्षे महापालिका ताब्यात असतानाही सांडपाणी समुद्रात सोडायचे, अशी ठाकरे यांची दुटप्पी भूमिका असल्याची टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. मुंबई महापालिका हातात असताना यांनी काहीच केले नाही, आता पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करतात, मुंबईसाठी काय केलं यांनी… यांना मुंबई नाईट लाईफ कल्चर हवंय. नाईट लाईफचं कल्चर कुठून आलं. मला वाटतं, आता जिथं गेले, तिथून शिकून आले असतील, असं शिंदे म्हणाले.

शिंदे गटावर कायम गद्दार अशी टीका केली जाते. त्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अडीच वर्षापूर्वी आपण काय केलं. तर मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला, बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, असं शिंदे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube