Chitra Wagh यांची कॉंग्रेसवर सडकून टीका; हेमा मालिनी अन् कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून आक्रमक

Chitra Wagh यांची कॉंग्रेसवर सडकून टीका; हेमा मालिनी अन् कंगनाबाबतच्या वक्तव्यावरून आक्रमक

Chitra Wagh Criticize Congress : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी हेमा मालिनी अन् कंगनाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून कॉंग्रेसवर ( Congress ) सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष राक्षसी शक्तींचं आगार बनला असावा. कारण, या पक्षाकडून वारंवार महिलांचा अपमान केला जात आहे.

लग्नाच्या चर्चांमध्येच तापसीचा पहिला व्हिडिओ समोर, नेटकऱ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर

यावर बोलताना वाघ म्हणाल्या की, नारीची जिथे पूजा होते तिथे देवतांचा निवास असतो. अशी भारतीय संस्कृतीत श्रद्धा आहे. त्या अर्थाने काँग्रेस पक्ष राक्षसी शक्तींचं आगार बनला असावा. कारण, या पक्षाकडून वारंवार महिलांचा अपमान केला जात आहे. काल काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी महिलांना उद्देशून अतिशय घाणेरडी लैंगिक टिप्पणी केली.

No Entry : श्रद्धा अन् क्रितीसोबत ‘नो एंट्री’ च्या सिक्वेलमध्ये मानुषी छिल्लरही दिसणार?

स्वतःला सभ्य म्हणवणाऱ्या समाजातल्या कुणाही व्यक्तीची मान शरमेनं खाली जावी. इतकी गलिच्छ भाषा त्यांनी आपल्या भाषणात वापरलीय. या भाषणात त्यांनी खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनीजी यांच्याबाबत सडकी मुक्ताफळं उधळलीत. पहिल्यांदा अभिनय आणि नंतर राजकीय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणाऱ्या हेमा मालिनीजींचाच हा केवळ अपमान नाहीये, तर सगळ्या अडथळ्यांवर मात करून स्वकर्तृत्वाने प्रगतीच्या वाटेवरून पुढे निघालेल्या सर्वसामान्य भारतीय स्त्रीचादेखील अपमान आहे.

Mai Tera Hero ला 10 वर्षे पूर्ण! नर्गिस फाखरीने शेअर केले खास फोटो

सुरजेवाला म्हणतात की, “आपण आमदार/खासदार कशासाठी बनवतो? जेणेकरून, ते आपला आवाज उठवतील. ही मंडळी कुणी हेमा मालिनी तर नसतात, जिला केवळ चाटण्यासाठी बनवलं जातं.” ही काँग्रेसवाल्यांची कुठली संस्कृती, जी महिलेचं इतकं घाणेरडं वर्णन करते? परवाच काँग्रेसच्या महिला नेत्यांनी भाजप उमेदवार आणि अभिनेत्री कंगणा रानावत यांना उद्देशून अशीच घाणेरडी कमेन्ट केली होती.

त्याही पूर्वी त्यांचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनी नारीशक्ती संपवण्याची भाषा केली होती. मला काँग्रेसवाल्यांना एवढंच सांगायचंय, असली चाटण्या-बिटण्याची भाषा करू नका. महिलांबाबतच्या तुमच्या विखाराला आवर घाला. नाही तर जनताच तुम्हाला या निवडणुकीत पराभवाची धूळ चाटवेल. असं म्हणत चित्रा वाघ यांनी कॉंग्रेसला धारेवर धरले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज