Mai Tera Hero ला 10 वर्षे पूर्ण! नर्गिस फाखरीने शेअर केले खास फोटो…

नर्गिस फाखरी हिच्या ' मैं तेरा हिरो’ या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण होत असून तिने या चित्रपटा बद्दल खास आठवणी जाग्या केल्या आहेत.

या चित्रपटाच्या फ्रेममध्ये तिने लक्ष वेधून घेतल आणि चित्रपटात आयशा सिंघल म्हणून कामगिरी केली ज्यात वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ देखील होते.

चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना नर्गिस म्हणाली, दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि माझे सहकलाकार वरुण धवन आणि इलियाना डिक्रूझ यांच्यासोबत काम करताना मला खूप आनंद झाला.

‘मद्रास कॅफे’ आणि ‘रॉकस्टार’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर नर्गिस हिचा हा तिसरा थिएटर रिलीज चित्रपट होता.
