वरुण धवनच्या बेबी जॉनचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘या’ तारखेला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  • Written By: Published:
वरुण धवनच्या बेबी जॉनचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘या’ तारखेला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Varun Dhawan Baby John Trailer: गेल्या वर्षी अ‍ॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता अ‍ॅटलीचा नवा चित्रपट ‘बेबी जॉन’ (Baby John) चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan ) रुपेरी पडद्यावर जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे.

देश बंडखोरांच्या ताब्यात, आता सीरियाचं काय होणार? 

गेल्या महिन्यात, निर्मात्यांनी बेबी जॉन चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता, जो लोकांना खूप आवडला होता. टीझरनंतर आता ट्रेलर प्रदर्शित झालाय. यामध्ये वरुण धवन याआधी कधीही न पाहिलेल्या अवतारात दाखवण्यात आलाय. अपेक्षेप्रमाणे, बेबी जॉनचा ट्रेलर ॲक्शनने भरलेला आहे आणि वरुण धवनने पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स दिलाय.

या चित्रपटात वरुण धवन, जॅकी श्रॉफसोबतच कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत. या ट्रेलरमध्ये वरुण धवनची व्यक्तिरेखा साधी दिसत असली तरी शेवटी त्याचा खतरनाक अवतार पाहायला मिळत आहे. वरुण धवन एका धाडसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत बलात्कार पीडितांसाठी लढतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो, असे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. तर जॅकी श्रॉफ हा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे. ट्रेलरमध्ये तो खूपच उग्र दिसतोय.

RBI चे नवे बॉस संजय मल्होत्रा यांच्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही 

3 मिनिट 6 सेकंदाच्या या ट्रेलरच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये सलमान खान देखील दाखवण्यात आलाय. तो वरुण धवनला सपोर्ट करताना दिसत आहे. त्याचा पूर्ण चेहरा अद्याप दाखवण्यात आलेला नसला तरी ही काही सेकंदांची क्लिप चाहत्यांना चित्रपटासाठी उत्कंठा वाढवण्यासाठी पुरेशी आहे.

दरम्यान, बेबी जॉन चित्रपटातील ‘नैन मटक्का’, ‘पिकले पोम’ ही गाणी व्हायरल होत आहे.

‘बेबी जॉन’ रिलीज डेट
ॲटली, केलीज आणि सुमित अरोरा यांनी लिहिलेला, ‘बेबी जॉन’ हा ॲटलीच्या 2016 मध्ये रिलीज झालेल्या तमिळ चित्रपट ‘थेरी’चा रिमेक आहे. हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

कॅलिस यांनी या चित्राचे दिग्दर्शन केले असून शाहरुख खानच्या ‘जवान’चे दिग्दर्शक ॲटली या चित्रपटाचे निर्माते आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube