स्वप्नीलने केला चक्क रिक्षाने प्रवास! नक्की काय घडलं…
Swapnil Joshi traveled by rickshaw to reach shooting : कलाकार कायम त्यांची स्वतः ची गाडी घेऊन प्रवास करताना (Entertainment News) दिसतात. सार्वजनिक वाहनांनी त्यांनी प्रवास केला, असं क्वचितच होतं. परंतु जर केव्हा त्यांनी असा प्रवास केला तर मग तो विषय चर्चेचा बनतो. अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) देखील पुन्हा याच कारणाने चर्चेत आलाय. स्वप्नीलने चक्क रिक्षाने प्रवास केल्याचं समोर आलंय.
श्रीलंकेचा पराभव अन् दक्षिण आफ्रिकेने दिला ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, WTC टेबलमध्ये फेरबदल
स्वप्नील जोशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये स्वप्नील जोशी रिक्षामध्ये दिसत आहे. आज अभिनेता स्वप्नील जोशीने चक्क रिक्षाने प्रवास (Swapnil Joshi News) केलाय. नेमकं कोणतं असं कारण होतं की, ज्यामुळे स्वप्नील जोशीला रिक्षाने प्रवास करावा लागला, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे.
महाराष्ट्र असिमीत ताकदीचे राज्य, पण थांबू नका; CM फडणवीसांचा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना कानमंत्र
अभिनेता स्वप्नील जोशीने चक्क रिक्षाने प्रवास केलाय. या मागची गोष्ट देखील तशीच आहे. मुंबई आणि इथलं ट्रॅफिक कोणाला चुकलं नाही, पण अश्यातच मुंबईत आज फ्लाय ओव्हरवर एका गाडीने पेट घेतला. मुंबई पोलीस अग्निशमन दलाच्या जवानांनी ही परिस्तिथी आटोक्यात आणली.या कारणामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. मग काय शूटला पोहचण्यासाठी स्वप्नीलने रिक्षाने प्रवास केला आणि तो शूटला पोहचला.
ही सगळी गोष्ट स्वप्नील जोशीने त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना सांगितली आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, स्वप्नील जोशी रिक्षामध्ये खाली उतरतो. तेव्हा सहकारी विचारतात की, गाडी कुठे आहे? त्यावर स्वप्नील म्हणतो की हा एक इंट्रस्टिंग किस्सा आहे. परमेश्वर आपल्याला जमिनीवर आणतोच. स्वप्नीलचा आगामी चित्रपट जिलेबी, याची चाहत्यांनी प्रतिक्षा आहे. या चित्रपटात स्वप्नीलचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे.