No Entry : श्रद्धा अन् क्रितीसोबत ‘नो एंट्री’ च्या सिक्वेलमध्ये मानुषी छिल्लरही दिसणार?

No Entry : श्रद्धा अन् क्रितीसोबत ‘नो एंट्री’ च्या सिक्वेलमध्ये मानुषी छिल्लरही दिसणार?

No Entry Manushi with Shradhha and Kriti : मानुषी छिल्लर ( Manushi Chhillar ) सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहे कारण एकामागे एक सुपरहिट चित्रपट करत ती प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे. ‘ऑपरेशन व्हॅलेंटाइन’ ( Opration Valentine ) आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ आणि पीरियड-ड्रामा ‘सम्राट पृथ्वीराज’ यांसारख्या ॲक्शनर्सचा शोध घेतल्यानंतर मानुषी एका कॉमेडी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

Mai Tera Hero ला 10 वर्षे पूर्ण! नर्गिस फाखरीने शेअर केले खास फोटो…

सूत्रानुसार मानुषी छिल्लर, श्रध्दा कपूर आणि कृती सेननसह 2005 मध्ये आलेल्या ‘नो एंट्री’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘नो एंट्री में एंट्री’ च्या प्रतिष्ठित स्टार कास्टमध्ये सामील होणार आहेत. याचा चर्चा सध्या इंडस्ट्रीत जोरदार होताना दिसतात. सूत्रांनी सांगितले की मानुषी अर्जुन कपूर, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार असून ती मुख्य भूमिकेत या सिक्वलमध्ये सामील होणार आहे.

Parampara Release Date: प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ 26 एप्रिलला मोठ्या पडद्यावर!

या वर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या या प्रोजेक्ट मध्ये मानुषी पहिल्यांदा क्रिती आणि श्रध्दा स्क्रीन शेयर करणार आहे. तर ही अभिनेत्री पहिल्यांदाच अर्जुन, वरुण आणि दिलजीतसोबत जोडी करताना दिसणार आहे. आता चर्चा सुरू असताना यावर विश्वास ठेवावा की नाही हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. तर मानुषी, क्रिती आणि श्रद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

Bihar Politics : उमेदवार निवडीत पॉलिटिक्स; एकाच वेळी 22 नेत्यांनी सोडली चिराग पासवानांची साथ

मानुषी छिल्लर वेगवेगळ्या शैलीतील स्क्रिप्ट्स निवडून एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिने सिद्ध करून दाखवल आहे. ती सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असून या ॲक्शनरच्या रिलीजनंतर मानुषी छिल्लर जॉन अब्राहम स्टारर ‘तेहरान’मध्ये दिसणार आहे. दरम्यान क्रिती तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘क्रू’च्या यशाचा आनंद घेत आहे, तर श्रद्धा ‘स्त्री 2’ च्या रिलीजसाठी तयारी करत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज