Parampara Release Date: प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ 26 एप्रिलला मोठ्या पडद्यावर!

Parampara Release Date: प्रणय निशिकांत तेलंग दिग्दर्शित ‘परंपरा’ 26 एप्रिलला मोठ्या पडद्यावर!

Parampara Marathi Movie Release Date: आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विविध परंपरा आहेत. (Marathi Movie ) या परंपरा पाळताना अनेकदा आर्थिक ओझंही येतं. अशाच एका परंपरेची गोष्ट “परंपरा” (Parampara Movie) या आगामी चित्रपटात मांडली जाणार असून, उत्तम स्टारकास्ट असलेला ‘परंपरा’ हा मराठी चित्रपट येत्या 26 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबोलो यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत “परंपरा” या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन प्रणय निशिकांत तेलंग यांचे आहे. चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे अभिनेत्री वीणा जामकर, प्रकाश धोत्रे, अरूण कदम, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमाण, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांच्या उत्तम भूमिका आहेत. त्यामुळे सकस कथानक, उत्तम स्टारकास्ट हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य ठरणार आहे.

चित्रपटाची पटकथा प्रणय निशिकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्हणून काम पाहिले आहे तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे.

Amar Singh Chamkila चं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; दिलजीत-परिणीतीचा रोमॅंटीक अंदाज

संस्कृती, रूढी, परंपरा जपताना अल्पभूधारक माणसाची होणारी फरफट चित्रपटाच्या केंद्रस्थानी असून नक्की अशी कोणती “परंपरा” आहे. ज्याचा त्या कुटुंबाला फटका बसतो यासाठी आपल्याला 26 एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज