Beed Loksabha : पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत… उदयनराजे भोसले राजीनामा देणार का?

Beed Loksabha : पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत… उदयनराजे भोसले राजीनामा देणार का?

Beed Loksabha : बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे आणि (Pankaja Munde) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्यात चुरशीची लढत सुरू असून, सध्या फेरतपासणी सुरू आहे. त्यामुळे बीडमध्ये नेमकं कोण विजयी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे. (Bajrang Sonawane) पंकजा मुंडे पराभवाच्या छायेत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे ती म्हणजे पंकजा मुंडे जर पराभूत झाल्या तर मी राजीनामा देणार असल्याच्या उदयनराजे भोसले यांच्या विधानाची. हे विधान उदयनराजे यांनी पंकजा मुंडेंच्या जाहीर सभेत दिला होता. आता उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे आता उदयनराजे राजीनामा देणार का? हा सवाल उपस्थित केला जात आहे.

Lok Sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत नारायण राणेंनी मारली बाजी, विनायक राऊतांचा पराभव

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, जाहीर सभांच्या माध्यमातून पंकजा मुंडेंकडून विरोधकांवर निशाणा साधला जात होता. अशातच राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असल्याने त्याचा परिणाम बीडमध्ये दिसून येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मराठा आंदोलनाची धग बीड जिल्ह्यात कायम असल्याने त्याचा फटका मुंडे यांना बसणार असल्याची शक्यता असल्याने पंकजा मुंडेंनी प्रचाराच्या अखेरीस मराठा कार्ड ओपन केल्याचं दिसून आलं होतं.

साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेला बोलावून मराठा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या जाहीर सभेला भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी उदयनराजे भोसले यांना स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर सभेला संबोधित करताना उदयनराजे भोसले यांनी पंकजा मुंडे ही माझी बहीण असून तिचा पराभव झाल्यास मी माझा राजीनामा देऊन साताऱ्यातून संधी देणार असल्याचा शब्दच पंकजा मुंडे यांना दिला होता. पंकजा मुंडे यांच्या जाहीर सभेत मराठा मतदारांसह सर्वच मतदारांनी पंकजा मुंडे यांना निवडून देण्याची साद उदयनराजेंनी घातली होती.

Andhra Pradesh Election: विधानसभा निवडणुकीत NDAची बाजी! आंध्र प्रदेश पुन्हा चंद्राबाबू CM

उदयनराजे भोसले भाषणात नक्की काय म्हणाले होते?
मी मनापासून सांगतो जर तुम्ही पंकजा मुंडेंना मतदान केलं नाही,तिला जर तुम्ही निवडून दिलं नाही, तर मी राजीनामा देईल आणि पंकजाला माझ्या तिथून निवडून आणेन हे लक्षात ठेवा. पण तसं होत नाही. मी येतांना बघत होतो, चोहोबाजूंनी कंपाऊंडला कुलूप लावतो. हो म्हणालात तर सोडतो. नाहीतर नाही सोडत. तर एका जीवाभावाच्या व्यक्तीला मदत करायची की नाही. तिला संधी मिळाली पाहिजे की नाही? ती काळ्याची पांढरी झाल्यानंतर तिला संधी मिळणार का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला होता. मी कुणाचे कौतुक करायला आलो नाही, ते महाराजांचे नाव घेऊन ते विकास करत आहेत. गरिबी हटाव म्हणून काम करत आहेत. मी एक सांगतो कृपा करा आई माझ्या बहिणीला निवडनू द्या, असं आवाहन उदयनराजे भोसले यांनी केलं होतं.

दरम्यान, सातारा लोकसभेत उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आहे, मात्र बीडमधून पंकजा मुंडे यांच्या रुपात भाजपला मोठा धक्काच बसल्याचं मानलं जात आहे. आता पंकजा मुंडे निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर उदयनराजे भोसले राजीनाम्याची भाषा पुन्हा करतील का? मुंडेंच्या पराभवानंतर उदयनराजे नेमकी कोणती भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज