कारखान्यांचा मालक बहुरंग सोनावणेला ‘कुणबी’ची गरज का पडली? हातात जातीचा दाखला दाखवत धनुभाऊंनी धुतलं

कारखान्यांचा मालक बहुरंग सोनावणेला ‘कुणबी’ची गरज का पडली? हातात जातीचा दाखला दाखवत धनुभाऊंनी धुतलं

Dhanajay Munde On Bajrang Sonawane : दोन-दोन कारखान्याचा मालक बहुरंग सोनावणेला कुणबी दाखल्याची गरज पडली, असल्याचं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang sonawane) यांना चांगलच धुतलं आहे. दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधी उमेदवार बजरंग सोनावणे यांचं नाव घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.

कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंवर कारवाई, सहा वर्षासाठी पक्षातून निलंबन

धनंजय मुंडे म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक फायदा गरीब शेतकरी कुटुंबातील पोराने घेतलायं, त्याचं नाव बहुरंग सोनावणे आहे. हातात बजरंग सोनावणे यांचा कुणबीचा दाखला दाखवत धनंजय मुंडे यांनी पुरावाच दिला आहे. तसेच ते म्हणाले बजरंग सोनावणे यांनी 11 जानेवारी रोजी कुणबीच्या दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना 14 जानेवारी रोजी कुणबीचा दाखला मिळाला. त्यानंतर लगेचच त्यांनी केजच्या निवडणुकीत ओबीसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा एवढा गरीब कारखानदार आहे की त्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज का पडली? यासाठीच होतं का मराठा आरक्षण आंदोलन? असा सवाल धनंजय मुंडे यावेळी बजरंग सोनावणे यांना केला आहे.

हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना दिलासा; निवडणुकीआधीच मिळाली क्लीनचिट

तसेच मराठा आरक्षणासाठी मी 1998 पासून चळवळीत काम करीत आहे. नरड्यातून रक्त पडेपर्यंत मी सभागृहात लढलो आहे. निजामकालीन दस्ताप्रमाणे दाखले दिले पाहिजे, आंदोलकांचा सरकारने सन्मान केला . कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जीआर सरकारने काढला, आणि गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. पण बजरंग सोनावणे या आंदोलनात एकदा तरी दिसला का? सोनावणेचं एक भाषण केलेलं दाखवावं.. हा एकदा तरी रस्त्यावर उतरला का? एक भाषण, एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला आला. हे भलं करणार आहे का याची अवकात आहे का? या शब्दांत धनंजय मुंडे यांनी समाचार घेतला आहे.

बजरंग सोनावणे तर बिगरजमीनीचा शेतकरी पुत्र ;
मी शेती करतो की नाही हे कृषिमंत्र्यांनी तपासावं, असं खुलं आव्हान बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडे यांना दिलं होतं. त्यावर बोलताना मुंडे म्हणाले, कृषिमंत्र्याला आव्हान दिलं तर स्विकारु, आज मी त्याच्या उमेदवारी अर्जात पाहिलं तर समजलं की हा शेतकरी पुत्र तर बिगर जमीनीचा आहे. याला जमीनच नाही. जी शेतीची जमीन आहे तेवढी जमीन प्लॉटिंगची असल्याचं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज