कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्राची जनता तुमचा घमेंड उतरवणार; राऊतांचे टीकास्त्र

कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, महाराष्ट्राची जनता तुमचा घमेंड उतरवणार; राऊतांचे टीकास्त्र

Sanjay Raut On PM Modi : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्रात सभांचा धडाका लावला आहे. प्रत्येक सभेतून ते ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका करत आहे. याच वरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मोदींवर घणाघाती टीका केली. शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा घ्या, रोड शो घ्या, हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभी न राहता तुमची घमेंड उतरवणार, अशी टीका राऊतांनी केली.

मी संपूर्ण महाराट्राची माफी मागतो! उद्धव ठाकरेंनी भर सभेत जोडले हात 

महाविकास आघाडीचे नाशिकचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आज नाशिकमध्ये ठाकरे गटाची सभा झाली. यासभेला संबोधित करतांना राऊतांनी भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, ही विराट सभा गॅरंटी देतेय की, राजाभाऊ शंभर टक्के दिल्लीला जाणार आहेत. गेल्या दहा वर्षांत ज्यांना खासदार होण्याची संधी देण्यात आली त्यांनी मतदारसंघात काय दिवे लावले? त्यांना पन्नास खोके मिळाले, शंभर खोके मिळाले, आणखी काय काय मिळालं? असा टोला राऊतांनी लगावला.

‘जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मोदी पहिलाच पंतप्रधान’; शरद पवारांची सडकून टीका 

राऊत पुढे बोलताना म्हणाले की, आज मिस्टर फेकू देखील नाशकात होते. भाड्याची माणसं तिथं आली. मोदींच्या भाषणादरम्यान एका तरुणाने प्रश्न विचारला. प्रधानमंत्री कांद्यावर बोला. कांदा निर्यातबंदी नंतर शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत, त्याच्यावर बोला. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी रागाने पाहिलं आणि आणि भारत माता की जय म्हणत ते बाहेर पडले. मात्र तो शेतकरी रामाचा देखील आहेत आणि भारत मातेचे सुपुत्र आहेत. जर पंतप्रधान हे काहीच न बोलता निघून जात असतील तर अशा थापाड्या पंतप्रधानाची देशाला गरज नाही. माझ्याशिवाय देशाला पर्याय नाही, ही मोदींची घमेंड आहे, अशी टीका करत ती घमेंड आता उरवण्याची वेळ आता आली, असं राऊत म्हणाले.

जिथे मोदींची सभा, तिथं भाजपचा पराभव
राऊत म्हणाले की, आज मोदी नाशिकमध्ये होते. नंतर कल्याणला गेले. कल्याणनंतर आता मुंबईत रोड शो केला. रोड शोसाठी संपूर्ण मुंबई बंद ठेवण्यात आली होती. गेल्या महिनाभरात मोदींनी महाराष्ट्रात २८ सभा घेतल्या. शिवसेनेमुळे नरेंद्र मोदींना रस्त्यावर यावे लागले. तुम्ही कितीही सभा आणि रोड शो केले तरी हा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहणार नाही. महाराष्ट्रात जिथे जिथे मोदींच्या सभा झाल्या, तिथे भाजपचा पराभव होईल. मोदी आले म्हणजे भाजप किंवा गद्दार जिंकले असं होत नाही. यावेळी भाजपला 400 जागा नाही तर भाजप तडीपार होणार, अशी टीका केली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज