राज्यावर मोंथा चक्रीवादळाचं सावट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार धुव्वाधार पाऊस

Cyclone Montha हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय झालं आहे. ज्यामुळे पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या Cyclone Remal चा राज्यावर परिणाम? अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा

Cyclone Remal

Heavy Rain in Maharashtra Cyclone Montha in Bay of Bangol : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस कोसळत आहे. ज्यामुळे अगोदरच प्रचंड नुकसान झालेल्या शेतीसह नागरी जीवन पुन्हा एकदा विस्कळीत होत आहे. यामध्ये आता राज्यभर पुन्हा एकदा मोंथा या चक्रीवादळाचं संकट घोंगावत आहे.

मोठी बातमी! ‘अल कायदा’शी संपर्कात असलेल्या तरुणास पुण्यात अटक

बंगालच्या उपसागरामध्ये मोंथा हे चक्रीवादळ सक्रिय झालं आहे. ज्यामुळे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. परिणामी पुढील 24 तासांत राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या काकीनाडा किनारपट्टीला आढळण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे.

आरशात पाहा… तुम्ही एक अजगर आहात जे कायम पडून राहतं, उद्धव ठाकरेंच्या ॲनाकोंडा’वरून भाजपचा पलटवार

या पार्श्वभूमीवर राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मोहम्मद शमीबद्दल मोठा निर्णय होण्याची शक्यता; बीसीसीआय निवडकर्त्यांनी अचानक घेतली भेट

दरम्यान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तर हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र सक्रिय असल्याने पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा आवाहन करण्यात आलं आहे.

Exit mobile version