Maharashtra Rain Alert : आज पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेर लावण्यास सुरुवात केली आहे. कालपासून (20 जुलै)

Maharashtra Rain

Maharashtra Rain

Maharashtra Rain Alert : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेर लावण्यास सुरुवात केली आहे. कालपासून (20 जुलै) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे तर आता आज देखील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज, मराठवाड्यासह कोकणात पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सातारा आणि पुणे (Pune Rain Alert) जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Alert) शक्यता आहे. त्यामुळे या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर संभाजीनगर जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे आज मुंबई (Mumbai Rain Alert) , ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता असल्यने या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. तर नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, जालना, धुळेसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मेष राशीसह ‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार ?

तर मध्य महासाष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहिजे त्या प्रमाणे पावसाने हजेरी न लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तर उकाड्याने सामान्य नागरिक त्रस्त होताना दिसत आहे.

Exit mobile version