Download App

अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

Kundalika river crosses danger level Raigad : रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) तडाखा सुरूच आहे. हवामान विभागाने आज देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी (Kundalika river crosses danger level) ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी (Raigad) देण्यात आली आहे.

अतिमुसळधार पावसाची शक्यता

पावसाने मागील चार दिवसांपासून कोकण आणि घाटमाथ्यावर धुमाकूळ घातलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागाने आज रायगडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सगळीकडे पाणीच पाणी साठलंय. याच पार्श्वभूमीवर रायगडमधील पाच तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलीय. यासंदर्भात, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पत्रक जारी केलंय.

निलेश राणेंनी पदाधिकाऱ्याला धमकावलं, बंधू नितेश राणेंचा गंभीर आरोप; युती धर्माची…

शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

हवामान खात्याने रायगडला अतिवृष्टीचा इशारा दिलाय. तर कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. त्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर तालुक्यांतील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा इशारा! कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी

रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झालीय. जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पामध्ये 60 टक्के पाणीसाठा जमा झालाय. तर जिल्ह्यातील सुतारवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे, उन्हेरे, पाभरे, संदेरी खिंडवाडी, आणि खैरेही 9 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. फणसाड आणि वावा ही धरणे सुद्धा लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.

 

follow us