Download App

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही तासांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: गेल्या काही तासांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरु असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, शहरातील प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानामध्ये (Siddharth Udyan) भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहे.

माहितीनुसार, या दोन्ही महिला उद्यानात कर्मचारी होत्या. स्वाती खैरनाथ (35) आणि रेखा गायकवाड (38) असं या मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान शहरात जोरदार वादळासह मुसळधार पावसाची सुरुवात. या दरम्यान सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा वरचा काही भाग नागरिकांच्या अंगावर पडला. यात 5 जण जखमी झाले असून दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

follow us