कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती पण त्याच्या बापाने…, खवल्या डोंगरावरील चांदगुडे प्रकरणात मोठा खुलासा
छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरील आत्महत्या घटनेत मोठे मोठे खुलासे होत आहेत. याच कुटुंबातील बबनराव पाटील यांनी मोठे खुलासे केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर ( Sambhajinagar) एक दुर्देवी घटना घडली. या घटनेने काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. कुणाल चांदगुडे याला आयफोन असल्याने त्याने हट्ट धरला आणि त्यावरून वडिलांसोबत त्याचा वाद झाल्याचं सांगितलं गेलं. पण त्यानंतर कुणालचे आजोबा बबनराव पाटील यांनी खुलासा केला की, कुणाल याच्याजवळ दोन आयफोन अगोदरच होते. मुलगा कुणाल हा खवड्या डोंगरावर गेला. त्यानंतर तिथे आई पोहोचली, आई त्याला गयावया करत होती. पण कुणाल हा कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. 3 तास त्याला समजावले जात होते. दरम्यान, त्याच्या आजोबांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
कुणाल आणि त्याच्या आई वडिलांचे फार चांगले संबंध होते. त्याचा आईवर जसा जीव होता तसाच त्याच्या वडिलांवरही होता. परंतु, कुणाल हा वडिलांवर थोडा नाराज होता. वडिलांचे जे काही नातेवाईक आहेत त्यांच्याशी कुणाल बोलत नव्हता. त्याला त्याचे वडिल तु का माझ्या नातेवाईकांशी बोलत नाही असं म्हणायचे. त्यावरून रागवायचे. पण कुणाल म्हणत होता की, मी कधीच त्यांच्याशी बोललो नाही, त्यांना चांगलं ओळखत नाही. मग आता कसं बोलू. मला नाही त्यांच्याशी बोलता येणार किंवा नाही बोलायला जमणार असं आजोबा यावेळी म्हणाले.
राखीपौर्णिमेआधीच बहिणींचा भाऊ हिरावला; चांदगुडे कुटुंबाच्या दुःखाने गाव सुन्न
त्याचबरोबर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले कुणाल ज्यावेळी खवड्या डोंगरावर गेला तेव्हा त्याला आत्महत्या करायची नव्हती. त्याच्या मनात एक तानतणाव होता. त्या तानतणावात तो होता. परंतु, त्याची आई-वडिल त्याला समजावून सांगत होते. किमान तीन तास त्याला सगळे समजावून सांगत होते. पण अचानक त्याचे वडिल त्याला धरायला पुढं गेले. त्यांचा हेतू त्याला ढकलायचा नव्हता तर वाचवायचा होता. पण त्यावेळी त्यांचा तोल गेला आणि दोघंही डोंगरावरून खाली पडले. पण जर त्याचे वडिल काहीवेळ पुढं आले नसते तर ही गोष्ट घडली नसती. कुणाल काहीवेळानंतर त्याच्या आईकडं परत आला असता असंही त्याचे आजोबा यावेळी म्हणाले आहेत.
हा डोंगर ज्या परिसरात आहे, तो भाग खडकाळ आहे. दगड, मुरूम काढण्यासाठीही अनेकजण येथे अवैध पद्धतीने उत्खनन करतात. म्हणूनच हा डोंगर खडकाळ, खवखवित, खड्डे असलेला झाला. त्यामुळेच या डोंगराला खवड्या डोंगर असं नाव पडलं असावं, असा अंदाज बांधला जातो. दरम्यान, हा खवड्या डोंगर संभाजीनगरातील नवा डेथ पॉइंट ठरला आहे. या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांची जीव संपवलेला आहे. म्हणूनच भविष्या अशा घटना घडू नयेत यासाठी खवड्या डोंगरावर उपायोजना करण्यात येणार आहेत.