Download App

राज्यात पुन्हा पावसाचा जोर! पुढील 5 दिवसांसाठी हाय अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Heavy Rains In Maharashtra : मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झालेल्या पावसाने जुलैच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार (Heavy rain) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाने 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुढील चार दिवसांसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांनी आवश्यक ती काळजी (Maharashtra Weather) घ्यावी, असा इशाराही दिला आहे.

मे महिन्यापासून सक्रिय झालेल्या पावसाने महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच दमदार हजेरी लावली आहे. जुलैच्या पहिल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र असलं तरी, आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात (Rain Update) आली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे 5 ते 9 जुलैदरम्यान राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Ashadhi Ekadashi 2025 : मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा, पाहा PHOTO

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या काळात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता असून, प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

5 जुलै
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर (घाटमाथा)
येलो अलर्ट : मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली

6 जुलै
रेड अलर्ट : पुणे (घाटमाथा)
ऑरेंज अलर्ट : कोल्हापूर, सातारा, नाशिक (घाटमाथा), कोकण किनारपट्टी (मुंबई वगळून)
येलो अलर्ट : मुंबई, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

7 जुलै
रेड अलर्ट : पुणे (घाटमाथा), रत्नागिरी, रायगड, भंडारा, गोंदिया, नाशिक, सातारा (घाटमाथा)
येलो अलर्ट : मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

आषाढी एकादशी 2025 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा, माऊली चरणी कोणतं साकडं घातलं?

8 जुलै
ऑरेंज अलर्ट : रत्नागिरी, गोंदिया, सातारा (घाटमाथा)
येलो अलर्ट : रायगड, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, कोल्हापूर व पुणे (घाटमाथा)

9 जुलै
येलो अलर्ट : तळ कोकण, सातारा व कोल्हापूर (घाटमाथा), नागपूर, भंडारा, गोंदिया

हवामान विभागाच्या सतर्कतेनंतर राज्य प्रशासनाने संबंधित जिल्हा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सखल भाग, नदीनिकट व डोंगराळ परिसरात विशेष लक्ष देण्यात येत असून, आपत्कालीन यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित स्थळी थांबावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

follow us