Download App

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द; प्रवाशांचे हाल, मुंबईत मुसळधार पाऊस

मुंईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. काल मोठ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक खोळंबली होती. आजही मोठा पाऊस सांगितला आहे.

Mumbai Rain : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरातील विविध भागात त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. दरम्यान, गेल्या सहा तासांमध्ये मुंबईत 300 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा मुंबईकरांसाठी सावधगिरीचा इशारा मानला जात आहे. दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  (Mumbai Rain ) सध्या नागरिकांना घराबाहेर पडण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Rain ) या परिस्थितीचा मध्य रेल्वे आणि हार्बर लाइन यांना फटका बसला आहे.

आज दिवसभर पाऊस  Puri Jagannath Rath Yatra : रथ यात्रेत चेंगराचेंगरी, चारशेहून अधिक भाविक जखमी

संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि त्यामुळे कल्याण-कसारा सेक्शनमध्ये खडवली आणि टिटवाळा दरम्यान लोकल ट्रेनची वाहतूक काल विस्कळीत झाली होती. ही स्थित आजही तशीच आहे. दरम्यान या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार असून. शहरात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, आज दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस राहील, रात्री मेघगर्जनेसह वादळाची शक्यता आहे.

वाहतूक विस्कळीत

संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस कोसळत असून, मुंबईच्या विविध भागात पाणी साचण्यास सुरुवात देखील झाली आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे, शिवाय रेल्वे सेवेवर देखील या पावसाचा परिणाम झाला आहे.

एक्स्प्रेस गाड्या रद्द VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?

भांडुप रेल्वे हे पाण्याखाली गेले असून सी एस एमटी वरून ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली, तर लांब पल्ल्याच्या मुंबईकडे येणाऱ्या गाड्या ठाणे आणि दिवा स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या सायन परिसरातील गांधी मार्केट मधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे देखील पाहायला मिळत आहे. याबरोबर पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

follow us