Puri Jagannath Rath Yatra : रथ यात्रेत चेंगराचेंगरी, चारशेहून अधिक भाविक जखमी
Puri Jagannath Rath Yatra 2024 : ओडिशामधील पुरी येथे रविवारी जगन्नाथ रथ यात्रा (Puri Jagannath Rath Yatra 2024) काढण्यात आली. भगवान बलभद्र यांच्या रथाचा तालध्वज खेचत असताना चेंगराचेंगरी झालीय. यात चारेशहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. त्यात दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले आहेत. यात एका भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
#WATCH | Lord Jagannath Rath Yatra chariot procession underway in Puri, Odisha
(Drone visuals) pic.twitter.com/MMbqtVjGbB
— ANI (@ANI) July 7, 2024
या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. जखमींना पुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्य मंत्री मुकेश महालिंग हे जिल्हा रुग्णालयात पोहचले आहे. त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे. तसेच डॉक्टरांना उपचाराबाबत सूचना दिल्या आहेत.
मोठी बातमी! वरळी हिट अँड रनप्रकरणी दोघांना अटक, राजेश शहाला ठोकल्या बेड्या
रविवारी रथयात्रेसाठी भाविकांची तुफान गर्दी झाली होती. लाखो भाविकांनी जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा यांचे दर्शन घेतले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी रथाची पूजा केली. त्यानंतर भगवान बलभद्र यांच्या रथाचे तालध्वज खेचण्यास सुरुवात झाली. त्यावेळी गर्दी अनियंत्रित होऊन चेंगराचेंगरी झाली.
VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?
लोक इकडे तिकडे पळत असताना एकमेंकाच्या अंगावर पडले. त्याच चारशेहून अधिक भाविक हे जखमी झाले आहेत. त्यातील काही जण गंभीर जखमी आहेत. त्यात एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. अनेक भाविकांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. खमींना सर्व प्रकारची मदत केली जाईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत.