आम्ही मोहोळ आहोत, तू कुस्ती कशी करतो ते पाहून घेऊ; हिंदकेसरी वादानंतर महेंद्र गायकवाडांचा गंभीर आरोप

महेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट सांगितले की, मी कुठल्याही प्रकारे जाणूनबुजून दुखापत केलेली नाही. कुस्तीच्या नियमांनुसार मी डाव टाकला होता.

Untitled Design 64 1

Untitled Design 64 1

Hindkesari Mahendra Gaikwad’s serious allegations : हिंदकेसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या वादानंतर पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जाणूनबुजून माझा हात मोडण्यात आला, असा आरोप मोहोळ यांनी केला होता. या आरोपांनंतर आता हिंदकेसरी विजेते महेंद्र गायकवाड यांनी सविस्तर खुलासा केला आहे. महेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मी कुठल्याही प्रकारे जाणूनबुजून दुखापत केलेली नाही. कुस्तीच्या नियमांनुसार मी माझा डाव टाकला होता. मात्र परिस्थिती धोकादायक होत असल्याचं लक्षात येताच मी लगेचच प्रतिस्पर्ध्याला सोडून दिलं.

अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादाचाच देखील या घटनेशी काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारला असता, गायकवाड यांनी तो आरोप फेटाळून लावला. त्या स्पर्धेत माझा कॉस्च्युम दोनदा फाडण्यात आला होता. ते मला पटले नाही म्हणून मी कुस्ती सोडून निघून गेलो. त्यानंतर देखील मी हात जोडून माफी मागितली. मात्र तरी देखील मला धमकी देण्यात आली. आम्ही मोहोळ आहोत, तू कुस्ती कशी करतो ते पाहून घेऊ, असं सांगण्यात आलं, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला.

पृथ्वीराज मोहोळ यांनी महेंद्र गायकवाड कायम वाद घालत असतात, असा आरोप केला होता. त्यावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, आमच्यात ही पहिली कुस्ती नव्हती. यापूर्वी देखील 6 ते 7 वेळा आमची कुस्ती झाली आहे. त्यामुळे पैलवानांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. हर्षवर्धन सदगीर यांना चालू कुस्तीत मारहाण केल्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी त्या घटनेबद्दल खेड व्यक्त केला. जे घडलं ते चुकीचं होतं. मी स्वतः हर्षवर्धन सदगीर यांचीच माफी मागितली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शंभूराज देसाई झेडपीतील मानहानीचा वचपा विधान परिषदेत काढणार ?

यावेळी महेंद्र गायकवाड यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाबद्दल देखील भावना व्यक्त केल्या. माझ्या चुलत्यांनी मला कुस्ती शिकवली. 2018 पासून मी या खेळात आहे. महाराष्ट्र केसरी तीन वेळा हरल्यानंतर माझ्याकडून काही होणार नाही असं वाटत होतं. पण मित्रपरिवार आणि कुटुंबाने मला आधार दिला. आज मी हिंदकेसरी झालो आहे, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, माझ्या चुलत्याचं स्वप्न होतं की मी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी व्हावं. आज ते हयात नाहीत, पण मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. वादग्रस्त डावांबाबत स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले, कुस्तीच्या नियमांनुसार हात 90 अंशांपर्यंत वळवण्याची परवानगी असते. मी त्याच नियमांनुसार डाव टाकला होता. मात्र तो डेंजर पोझिशनमध्ये जात असल्याचं लक्षात येताच मी लगेच सोडून दिलं.

हिंदकेसरी ‘किताब जिंकल्यानंतर आता पुढील लक्ष्य काय? यावर उत्तर देताना महेंद्र गायकवाड यांनी एशियन गेम्स, वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक पदक किंकण्याचं स्वप्न व्यक्त केलं. आमच्यात कुठलीही वैयक्तिक दुश्मनी नाही. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज पैलवानांनी देखील माझा दावा योग्य असल्याचं सांगितलं आहे. प्रतिस्पर्ध्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला. त्यामुळे मी चुकीचं केलं असं मला वाटत नाही, असं देखील त्यांनी शेवटी स्पष्ट केलं.

Exit mobile version