शिंदेंनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर राऊत खासदार नसते : गुलाबराव पाटील

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर टीका खूप टीका केली जात आहे. संजय राऊत आमच्यावर सातत्यानं टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते, अशी […]

Untitled Design (24)

Untitled Design (24)

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर टीका खूप टीका केली जात आहे. संजय राऊत आमच्यावर सातत्यानं टीका करताहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता दाढीवर हात फिरवला असता तरी संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते, अशी जोरदार टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. ते हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते, आडवे झाले असते अशा शब्दांमध्ये जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी 41 मतं मिळाली ती फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळेच असेही यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये पाटील म्हणाले की, खुर्चीपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे. मी मंत्री आहे की आमदार आहे, यापेक्षाही आम्ही हिंदू आहोत, हे महत्त्वाचं आहे. खुर्ची देणारे पण तुम्हीच खुर्ची उडवणारे पण तुम्हीच आहेत, त्यामुळं धर्म महत्वाचा आहे. पुढे पाटील म्हणाले की, आम्ही कुणाच्या धर्माला दुखावत नाही, पण आमच्या धर्माविषयी कोणी वाकडी नजर करत असेल तर आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय.

Exit mobile version