पुणे : राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक व्हायला लागले, तर मायबाप सरकार कसं असेल, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे. सुळे एका कार्यक्रमादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, मी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खूप हुशार समजत होते, मात्र राज्याचे गृहमंत्रीच आक्रमक होत असतील तर मायबाप सरकार कसं असेल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केलीय.
Girish Mahajan : ‘अजितदादा, तुम्हाला गद्दारीवर बोलण्याचा अधिकार नाही’
देवेंद्र फडणवीस कर्तृत्ववान आहेत म्हणूनच त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळालं आहे, आमचा विरोधक असला म्हणून काय झालं तो दिलदार असला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
Congress : काँग्रेसनेही केलाय निवडणूक जिंकण्याचा प्लान; ‘या’ पद्धतीने देणार भाजपला झटका..
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मला जेलमध्ये टाकण्याचा कट रचण्यात आल्याचं म्हंटलं होतं. मात्र मला जेलमध्ये टाकणारेचं जेलमध्ये गेल्याचं फडणवीस म्हणाले. त्यानंतर सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय.
राज्यात सध्या लव्ह जिहाद प्रकरणावरुन आंदोलने होताहेत, त्यावरुनही त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. राज्यात महिला सुरक्षित नाहीत म्हणूनच आंदोलने होत आहेत. नूकताच राज्य सरकारने एक कायदा आणलाय, त्यामध्ये इंटरकास्ट हा शब्द नसून महिलांच्या काही मागण्या आहेत. महिलांनी आजच्या कार्यक्रमात भेटून मला त्या सांगितल्या आहेत.
महिलांच्या मागण्यांबाबत आम्ही भाजपचे मंत्री आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. महाराष्ट्राचा लॉयन ऑर्डर व्यवस्थित नाही, त्यामुळेच मुलींची सुरक्षितता, कोयता गॅंग, पत्रकाराची हत्या असे प्रकार उभ्या महाराष्ट्रात घडत असून हे या ईडी सरकारचं अपयश असल्याचंही त्यांनी म्हंटलंय.