मुंबई : तुम्ही जर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर लवकर घ्या. अन्यथा जास्त पैसे मोजावे लागतील कारण रेडिरेकनरच्या दरात पुन्हा 10 टक्काची वाढ करण्यात येणार आहे. ही दर वाढ 1 एप्रिल पासून लागू करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांत रेडीरेकनरचा दर सरासरी 15 टक्के वाढला आहे. मागच्या वर्षी हा दर 5 टक्के वाढला होता.
लोकडाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे रेडीरेकनर दरात मागील दोन वर्षांत एवढ्यामोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच व्याजाचा दर वाढवल्यानंतर आता रेडिरेकनरचे दर ही वाढू शकतात. परिणामी घराच्या किमती वाढणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न धूसर झाले आहे.
Sanjay Raut : आम्ही अजिबात गुडघे टेकणार नाही कारण जनता आमच्याबरोबर; राऊतांचा हल्लाबोल
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने रेडीरेकनर दर वाढवल्यास आता घेरे आणि जमिनीच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. हा दर वाढीचा प्रस्ताव नोंदणी आणि मुद्रांक विभागाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.
राज्य सरकार या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते. आता 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. गेल्या दोन वर्षात रेडीरेकनर दरात ही दुसरी वाढ असेल. त्यामुळे सर्वसामन्याला घर घेताना आता विचार करावा लागणार आहे.
फेब्रुवारीमध्ये GST संकलन 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, महाराष्ट्राने दिला सर्वाधिक GST
ही दर वाढ ग्रामीण भागासह शहरी भागात होणार आहे. ग्रामीण भागातील ग्रांमपंचायत तसेच नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात 10 टक्क्यांपर्यंत होऊ शकते तास प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.