फेब्रुवारीमध्ये GST संकलन 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, महाराष्ट्राने दिला सर्वाधिक GST
दिल्ली : देशातील वस्तू आणि सेवा कर (GST) संकलनाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीमध्ये जीएसटी संकलन 1,49,577 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे 12 टक्क्यांनी वाढले आहे. तो 12 महिन्यांच्या उच्चांकावर असल्याचे अर्थ मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये महाराष्टाने सर्वाधिक 22349 कोटी रुपयांचा (GST) दिला आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताचा जीएसटी महसूल 1,33,026 कोटी रुपये होता.
चांगली गोष्ट म्हणजे हा सलग 12वा महिना आहे जेव्हा मासिक जीएसटी संकलन 1.4 लाख कोटींहून अधिक झाले आहे. यावेळी हा आकडा 1,49,577 कोटी रुपयांवर आला असून तो गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत 12 टक्के अधिक आहे.
Sharad Pawar : …म्हणून भाजपला पाठिंबा दिला, पवारांनी सांगितलं नागालॅंडमधील युतीचं कारण
जानेवारी महिन्यात जीएसटी संकलन असे होते
जानेवारीमध्ये जीएसटी संकलनात आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये सलग 11व्या महिन्यात 1.55 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST महसूल प्राप्त झाला. जानेवारी महिन्यात सरकारला 1,55,922 कोटी रुपये म्हणजेच 1.55 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन मिळाले होते.
अर्थ मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली
फेब्रुवारी 2023 साठी जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर करताना, अर्थ मंत्रालयाने सांगितले की या महिन्यात उपकर म्हणून 11,931 कोटी रुपये जमा झाले, जी जीएसटी लागू झाल्यानंतरची ही सर्वोच्च पातळी आहे.
Hasan Mushrif यांच्या घरी पुन्हा ईडी अधिकारी, दोन महिन्यात तिसरी कारवाई
जीएसटी संकलन मागील वर्षापेक्षा 12 टक्क्यांनी वाढले
वर्षभरापूर्वी याच महिन्यात जीएसटी संकलन 1.33 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, फेब्रुवारी 2023 मध्ये, जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढले आहे. मंत्रालयाने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवस असल्याने जीएसटी संकलन इतर महिन्यांच्या तुलनेत कमी आहे.