Download App

स्वतः राजीनामा दिल्यांनतर आम्ही परत सत्तेवर कसं आणू शकतो? कोर्टाचा ठाकरेंना सवाल

  • Written By: Last Updated:

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा स्वतः राजीनामा दिला आहे. स्वतः राजीनामा दिलेल्या सरकारला आम्ही पुन्हा सत्तेवर कसं आणू शकतो? असा सवाल सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे गटाला विचारला. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले.

आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात आलं. पण युक्तिवाद संपण्यापूर्वी ठाकरे गटाकडून आपली बाजू मांडली. त्यावेळी न्यायालयाने देखील काही प्रश्न विचारले.

यावेळी राज्यपालाच्या भूमिकेवर युक्तिवाद करताना शिंदे गटाची पक्षांतर्गत भूमिका राज्यपालांपर्यंत कशी पोहोचली? असा प्रश्न विचारत पक्षांतर्गत मतभेदात हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यपालांना नाही. असा मुद्दा ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांनी मांडला. त्यावर उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिला, त्यांना आम्ही पुनर्स्थापित कसे काय करू शकतो? असा प्रश्न सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरे गटाच्या वकिलांना केला.

त्यावर ठाकरे गटाच्या वकिलांडी सावध पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करा, अशी आमची मागणी नाही तर परिस्थिती जैसे थै करा, अशी आमची मागणी असल्याचे सिंघवी म्हणाले. ते पुढे म्हणाले की राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने बहुमत चाचणीचे आदेश दिले. त्याचे परिणाम माहित होते. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला.

https://www.youtube.com/watch?v=7EZp9IFrVIU

Tags

follow us