Download App

मराठा अन् ओबीसी आरक्षणाचं कोडं कसं सोडवणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान…

Cm Eknath Shinde : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, त्यावरुन राज्यातील मराठा आंदोलकांमधून सरकारविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असा पवित्राच आंदोलकांनी घेतला असल्याने दुसरकीकडे ओबीसी समाजही आक्रमक होताना दिसत आहे, त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याचं कोडं सरकार कसं सोडवणार? हा पेच सरकारसमोर असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

Bharat vs India : ‘इंडिया’चं ‘भारत’ होणार का? युएनने सांगितले, प्रस्ताव आला तर नक्कीच…

मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लावणार नसल्याचं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच अशा परिस्थितीत राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाची कोणीही दिशाभूल करु नये, आम्ही मराठा समाजाच्या मागसलेपणावर काम करीत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंनंतर कोपर्डीतही आंदोलकांची तीच भूमिका…

जालन्यामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस असून सरकारने निजामकालीन कुणबी असल्याचे पुराव्यानूसारच कुणबीचे प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, त्यावर सरकारचा निर्णय आम्हाला मान्य असून पुढील काळातही हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

Govt. Schemes : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येणार?

त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असून काही मंडळी दिशाभूल करून मराठा समाज आणि ओबीसी बांधवांमध्ये मतभेद, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही दुर्देवी बाब आहे, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.



जालन्यात नेमकं काय घडलं?

आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाच्यावतीने जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन करण्यात येत होते. आंदोलन सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावरून जोरदार गोंधळ उडाला. त्याचवेळी जोरदार दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत दहा ते बारा पोलिस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे. आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं.

Tags

follow us