HSC Result 2026 : नुकतंच सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र बोर्ड एसएससीचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र एसएससी बोर्डाकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
तर आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, पुढील 2 ते 3 आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागू शकतो असा दावा माध्यमांमध्ये करण्यात येत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याची पालक आणि विद्यार्थी अतुरतेने वाट पाहत आहे.
माध्यमांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, एचएससी (HSC) बोर्डाचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागू शकतो तर या निकालाच्या 10 ते 12 दिवसानंतर दहावी एसएससी (SSC) बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागू शकतो. तर दुसरीकडे बारावी आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत महाराष्ट्र बोर्डाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मोठी बातमी ! भोंदूबाबा अशोक खरातला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी-
पालक आणि विद्यार्थी एसएससीचा निकाल ssc.gov.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. तर बारावीचा निकाल hscresult.mkcl.org या वेबसाइटवर देखील पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याचा सीट नंबर आणि आईचे नाव असणे आवश्यक आहे.
