Video : दोन जिल्हे, कॅबिनेट मंत्रिपद अन् शिंदेंचा काँग्रेस प्रवेश; हुसैन दलवाईंचा सर्वात मोठा दावा

Hussain Dalwai On Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना

Husain Dalwai On Eknath Shinde

Husain Dalwai On Eknath Shinde

Husain Dalwai On Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा केल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी देखील मोठा दावा केला आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा त्यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे. त्यावेळी शिंदे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची अट घातली होती परंतु नारायण राणे यांचा विरोध असल्याने शिंदे यांचा पक्ष प्रवेश होऊ शकला नाही असा दावा हुसैन दलवाई यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला आहे.

लेट्सअप मराठीशी बोलताना काँग्रेस नेते हुसैन दलवाई (Husain Dalwai) म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांना फोन करुन भेटण्यासाठी वेळ मागितला होता. या भेटीदरम्यान मी काँग्रेसमध्ये यायला तयार आहे. मी जर काँग्रेसमध्ये (Cogress) आलो तर दोन जिल्हे (ठाणे आणि पालघर) तुमच्यासबोत असतील पण मला कॅबिनेट मंत्रिपद पाहिजे असं एकनाथ शिंदे म्हणाले असल्याचा दावा दलवाई यांनी केला आहे.

तेव्हा मी त्यांना सांगितलं की, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याशी चर्चा करुन सांगतो. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा केल्यानंतर मी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या कामाबद्दल देखील माहिती दिली होती. त्यानंतर बरेच दिवस काही घडले नाही. त्यानंतर मला एकनाथ शिंदे यांचे फोन येत असल्याने मी पुन्हा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळी ते म्हणाले की, याबाबत दिल्लीत चर्चा सुरु असून पुढे काय होतं, ते मी तुम्हाला सांगतो असं सांगितलं. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होऊ शकत नाही कारण या पक्ष प्रवेशाला नारायण राणे यांचा विरोध असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी मला दिली असल्याचा दावा हुसैन दलवाई यांनी केला आहे. तसेच जर त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असता, तर आज राज्यात काँग्रेस सत्तेत असते असं देखील यावेळी हुसैन दलवाई म्हणाले.

गोपीनाथ मुडें काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते; चर्चा झाली पण…

तर दुसरीकडे या मुलाखतीमध्ये गोपीनाथ मुंडे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा त्यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे जेव्हा उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, तू आमच्याबरोबर ये मी तुला मंत्रिपद देतो. पण मी त्यावेळी त्यांना म्हणालो की, तुमची आणि माझी चांगली मैत्री आहे. आपण मित्र म्हणून राहूया पण मी भाजपमध्ये येऊ शकत नाही असं हुसैन दलवाई म्हणाले.

तर काँग्रेस प्रवेशावर बोलताना दलवाई म्हणाले की, जेव्हा मला कळलं की, गोपीनाथ मुडें काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे तेव्हा मी सोनिया गांधी यांना फोन केला होता. जर गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असेल तर राज्यात काँग्रेस वाढण्यास मदत होईल असं सोनिया गांधी यांना मी सांगितलं होतं पण दुर्दैवान ते घडलं नाही.

मंत्रालयात ‘लेटर बॉम्ब’; मुंबई महापालिकेचे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या खात्यावर गंभीर आरोप

जेव्हा गोपीनाथ मुंडे सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी जात होते तेव्हा अहमद पटेल यांचा कॉल आला होता. तेव्हा त्यांनी तुम्हाला आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. तुम्हाला आधी भाजपचा राजीनामा द्यावा लागेल आणि त्यानंतर काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागेल असं सांगितलं असल्याचा दावा हुसैन दलवाई यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना केला.

Exit mobile version