Download App

मी भाजपचा खासदार माझ्यामागे ईडी लागणार नाही, राष्ट्रवादीकडून तो व्हिडिओ व्हायरल

  • Written By: Last Updated:

मुंबई : सध्या राज्यातील विरोधात असलेल्या ठाकरे गटाचे अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी करत आहे. काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरी धाड टाकली हे धाड सत्र नऊ तास सुरु होत. यानंतर ईडीने हसन मुश्रीफांना सोमवारी चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने महेश तपासे यांनी खासदार संजयकाका यांच्या जुना व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये मी भाजपचा खासदार माझ्या मागे ईडी लागणार नाही, आमचेही कारखाने आहेत पण आमच्याकडे ईडी येणार नाही. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यानंतर महेश तपासे म्हणतात आमचा संशय खरा ठरला, ईडी फक्त विरोधी लोकांमागेच लागते. यावर भाजप काही बोलणार आहे का? अशा सवाल महेश तपासे यांनी केला.

तसेच काही दिवसापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील अशा आशयाचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते मी भाजपमध्ये आहे त्यामुळे मला चांगली झोप येते. कारण मला ईडी सीबीआयची भीती नाही. असं वक्तव्य त्यांनी केलं होत.

Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या मनाचे नेते, त्यांचे ऐकू नका मला निधी द्या’ 

सध्या राज्यासह देशातील मोठ्या नेत्यानं मागे ईडी आणि सीबीआयची चौकशी लागली आहे. देशात सरकारच्या विरोधात असलेले लालू प्रसाद यादव यांच्या मुलांची चौकशी नुकतीच ईडीने केली. तसेच महाराष्ट्रात 2019 महाविकास आघाडीचे सरकार आले. आणि त्यानंतर या सरकार मधील मंत्र्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय यांच्या चौकशीचा ससेमिरा सुरु झाला. यामध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची धाड पडली. जवळ पास एक वर्ष तुरुंगात राहून अनिल देशमुख बाहेर आले.

सतीश कौशिकची 15 कोटींसाठी हत्या, धक्कादायक दावा समोर…दिल्ली पोलीसांकडून तपास सुरु

त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली. ते सध्या तुरुंगात आहेत, तसेच ठाकरे गटाचे फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली होती. ते देखील तीन महिने तुरुंगात राहून बाहेर आले. केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहे. कारण त्यांचे म्हणणे आहे कि ईडी आणि सीबीआय फक्त विरोधकांची चौकशी करते सरकारमध्ये असलेल्या भाजप नेत्यांकडे ईडी जात नाही.

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us