Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या मनाचे नेते, त्यांचे ऐकू नका मला निधी द्या’

Rohit Pawar : ‘राम शिंदे छोट्या मनाचे नेते, त्यांचे ऐकू नका मला निधी द्या’

अहमदनगर : राम शिंदे (Ram Shinde) पालकमंत्री असताना कर्जतमध्ये प्रकल्प सुरु झाले होते. मधल्या काळात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार येऊनही आता आपल्याच हस्ते उदघाटन झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. तर राम शिंदे छोट्या मनाचे नेते आहेत त्यांचे ऐकू नका मलाच निधी द्या. माझ्या कामांना स्थगिती देऊ नका, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे. काल आमदार राम शिंदेंनी कर्जत येथे शेतकरी मेळावा व विविध विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, हे सगळे प्रकल्प राम शिंदे जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्याची आम्ही सुरुवात केली होती. मध्यतंरी सरकार बदललं पण काम पूर्ण झालं नाही. आम्ही उद्घाटनाला यावी ही कामाची इच्छा होती. त्यामुळे विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यासोबत कामांच उद्घाटन केलं, अशी टीका महाविकास आघाडीवर फडणवीसांनी केली होती.

संतापजनक! शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वेंचा मार्फ व्हिडीओ व्हायरल

यावर रोहित पवार म्हणाले, राम शिंदे म्हणाले ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे वंशज आहेत. विचाराचे वंशज आपण सर्वजण आहोत. खरे वंशज अक्षय शिंदे आहेत. राम शिंदेंचा चौंडीत बंगला आहे. मंत्री असताना त्यांनी एक रुपयांचा निधी आणला नाही. आता प्रलंबित असलेला निधी मी आणला आणि आधिकचे 11-12 कोटी दिले. त्याला देखील त्यांनी स्थगिती दिली, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

गेल्या 5 वर्षात कर्जत-जामखेडला टॅंकर लागत नाही. मी मतदारसंघ टॅंकरमुक्त केला. फडवीसांच्या कार्यकाळात कर्जतमध्ये अनेक विकासाची कामं आणली. तुकाईच काम प्रलंबित आहे, हे फडणवीसांच्या कानावर घालताच त्यांनी कामाला मंजुरी दिली. पण, पुढं पराभाव झाला. त्यानंतर तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप काही लोकांनी केलं, अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube