Download App

मी डान्स केला अन् विषय कुठल्या कुठे गेला…

  • Written By: Last Updated:

पुणे : ‘मी वेस्टर्न डान्स करत होते. पण दहीहांडीसारख्या कार्यक्रमात आयोजकांकडून वेगवेगळे गाणे लावण्यात आले. त्यावर मी डानेस करत गेले आणि माझ्या डान्सचा फॉर्म बदलत गेला. तो गाणे लावत गेला मी डान्स करत गेले आणि विषय कुठल्या कुठे गेला. झालं असं केलं की, मी लावणीचा वेशभूषा केलेली असल्याने मी वेस्टर्न डान्स करत होते. पण त्याला वळण मिळालं आणि आजचा माझा डान्सचा फॉर्म निर्माण झाला.’ अशी प्रतिक्रिया लावणी कलाकार गौतमी पाटीलने दिली आहे.

नुकतचं गौतमी पाटीलने एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. गौतमीने पहिल्यांदाच अशी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तीला लावणीकडे कशी वळाली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लावणी कलाकार गौतमी पाटीलने मी डान्स केला अन् विषय कुठल्या कुठे गेला… अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत तीने आपल्यावर होत असलेल्या आरोपांचं खंडन करत मी काही चुकीचं करत नसल्याने मला काही माझी कला थांबवण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया तीने यावेळी दिली.

लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा बाजू घेतली होती. गौतमी पाटील गुन्हा काय असा प्रश्न सत्यशोधक सचिन माळी यांनी उपस्थित केला. तसेच गौतमी पाटीलवर आक्षेप घेणाऱ्यांचे कानही माळी यांनी टोचले होती.

Tags

follow us