Download App

मी अमृताकडे वळतो, अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले सभागृहात हशा पिकला, काय होता किस्सा?

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या घोषणा केल्या. या शिवाय, नदीजोड प्रकल्पाविषयी देखील अर्थसंकल्पात चर्चा करण्यात आली.

अर्थसंकल्प सादर करताना हा अमृतकालातील पहिला अर्थसंकल्प हा ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे अर्थसंकल्प वाचताना फडणवीस यांनी या पाच मुद्यावरच अर्थसंकल्प वाचला. अर्थसंकल्प वाचायला सुरुवात करताना फडणवीस पहिल्या अमृताकडे वळतो असं म्हणाले होते. नंतरच्या प्रत्येकवेळी मात्र हुशारीनं शब्दबदल करत द्वितीय, तृतीय अमृताकडे म्हणत गेले.

हेही वाचा : Maharashtra Budget 2023 : सायबर गुन्ह्यांसाठी सुरक्षा प्रकल्प उभरणार; राज्याच्या सुरक्षेत मोठी वाढ

मला सावधानतेनं बोलावं लागतंय. कारण…

शेवटी पाचवा अमृत वाचत असताना मात्र त्यांनी मी ‘पंचम अमृत’ कडे वळतो असं म्हणाले. आणि त्यावर स्वतःच मला सावधानतेनं बोलावं लागतंय. कारण अमृताकडे वळतो असं म्हणतोय. असं त्यांनीच दिलखुलासपणे सभागृहात सांगितलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या याच वक्तव्यावरून सभागृहात हशा पिकला.

अर्थसंकल्पातील पाच अमृत कोणते ?

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याचं सांगितलं. ते पाच अमृत खालीलप्रमाणे

1)शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
2)महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा विकास
3)भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
4)रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा
5)पर्यावरणपूरक विकास

Tags

follow us